शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

शिवसेना-भाजपाचं जमलं! उद्या युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 6:24 PM

गेल्या काही दिवसांपासून युतीसाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती

मनोहर कुंभेजकरमुंबई : गेले काही दिवस भाजपा व शिवसेनेत युती होणार की नाही याबद्दल शिवसेनाभाजपात साशंकता होती. मात्र, याला आता पूर्णविराम मिळाला आहे. उद्या, सोमवार दि, 18 रोजी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह खास मुंबईत येत आहेत. शाह व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बीकेसी एमसीए येथे सायंकाळी 6 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची अधिकृत माहिती लोकमतला मिळाली आहे.लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या युतीतील जागावाटपाचा ठरलेला अंतिम फॉर्म्युला उद्या पत्रकार परिषदेत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दोन दिवसांपूर्वीच रात्री युतीबाबत महत्वाची बैठक झाली. यावेळी शिवसेनेकडून शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई व भाजपाकडून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या बैठकीची गुप्तता ठेवण्यात आली होती.  या बैठकीत लोकसभा व विधानसभा निवडणुका युती एकत्रीत लढण्याचे ठरले असून या दोन्ही निवडणुकीचा फॉर्म्युला देखिल ठरला, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात लोकसभेसाठी दोन्ही पक्ष २४-२४ जागा लढणार असून विधानसभेच्या १४५ जागा भाजपा लढेल, तर शिवसेनेला १४३ जागा दिल्या जातील हा फॉर्म्युला या बैठकीत ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर लोकसभेची पालघरची जागा शिवसेनेला देण्याला भाजपाने अखेर अनुकूलता दाखवली आहे. तसेच शिवसेनेच्या काही महत्वाच्या मागण्यादेखिल भाजपाने मान्य केल्याचे या बैठकीत ठरल्याचे समजते. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९