शिवसेना-भाजपा महायुतीची पत्रकाद्वारे घोषणा, जागांचा फॉर्म्युला गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 07:53 PM2019-09-30T19:53:24+5:302019-09-30T19:55:17+5:30

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

Shiv Sena-BJP announces by letter of Mahayuti, formula of seats in bouquet in maharashtra | शिवसेना-भाजपा महायुतीची पत्रकाद्वारे घोषणा, जागांचा फॉर्म्युला गुलदस्त्यात

शिवसेना-भाजपा महायुतीची पत्रकाद्वारे घोषणा, जागांचा फॉर्म्युला गुलदस्त्यात

Next

मुंबई - शिवेसना-भाजपा आणि रिपाइं महायुतीची घोषणा करण्यात आली आहे. भाजपा आणि शिवसेनेच्या संयुक्त पत्रकाद्वारे महायुतीची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका कार्यक्रमात हे युतीचं पत्र जाहीर करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या हस्ताक्षराने हे पत्र छापण्यात आलं आहे. या पत्रामध्ये युतीची घोषणा करण्यात आली आहे. पण, जागांचा तिढा अद्यापही गुलदस्त्यात आहे. पण, 124 जागांवर शिवसेनेला राजी करण्यात आल्याचं समजतंय.

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, अजूनही भाजप-शिवसेना युतीतील जागावाटाप बाबतचा निर्णय होऊ शकला नव्हता. कटाप्पाने बाहुबलीला का मारले याच्या उत्तराची जेवढी प्रतिक्षा जनतेला होती, तेवढीत युतीच्या निर्णयाचीही प्रतीक्षा महाराष्ट्रातील जनतेला लागून राहिल होती. अखेर, युती होणार की नाही? या प्रश्नाचं उत्तर हो... असं मिळालं. त्यामुळे युतीच्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे. 

भाजपा-शिवसेना, शिवसंग्राम, रासपा, आरपीआय, रयतक्रांती संघटना मिळून आगामी निवडणुकीला सामोरं जाणारं आहोत. याबाबत अधिकृत घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात आम्ही जे काम केलं त्याआधारे जनतेचे मत मागणार आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात महायुतीला मोठा महाजनादेश मिळणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना, भाजपा , रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुती झाल्याची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. युतीची घोषणा झाली पण भाजपा आणि शिवसेना राज्यातील किती जागांवर निवडणुका लढवणार याचा फॉर्म्युला अद्यापही गुलदस्त्यात आहे. युतीच्या निर्णयावर अनेकांचे राजकीय भवितव्य अवलंबून होते. त्यामुळे युतीची घोषणा होताच बंडखोरी पाहायला मिळणार आहे. पण, यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला होता.
विधानसभा निवडणुकीत युती होणार आहे. मात्र युतीनंतर बंडखोरीची शक्यता बिलकुल नाही. त्याचे कारण असे की, भाजप-शिवसेनेचं संघटन संपर्क मोठा असल्याने नाराज नेते आणि कार्यकर्त्यांना समजवण्याची काही व्यवस्था असल्याचे पाटील म्हणाले. तर नाराज होणार हे नैसर्गिक आहे, मात्र ते त्यामुळे बंडखोरी करून दुसऱ्या पक्षात जातील याची शक्यता नसल्याचा दावाही पाटील यांनी केला. जागावाटप पूर्ण झाला असून लवकरच एका पत्रकाच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. 


 

Web Title: Shiv Sena-BJP announces by letter of Mahayuti, formula of seats in bouquet in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.