शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसंग्राम पक्ष आगामी निवडणुकीत युती सोबतच : विनायक मेटे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 21:45 IST

आता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसंग्राम पक्ष सर्व ताकदीने निवडणुकीमध्ये उतरणार आहे.

ठळक मुद्देअभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद यांचा शिवसंग्राम पक्षात प्रवेशआगामी निवडणुकीत ही आमदार संख्या ५ ते १० पर्यंत जाण्याचा निर्धार

पुणे: आगामी वर्ष निवडणुकांचे वर्षे असून शिवसंग्राम पक्ष लोकसभा, विधानसभा निवडणुका भाजप युतीसोबत लढविणार असल्याची घोषणा आमदार विनायक मेटे यांनी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पक्ष प्रवेश व पदाधिकारी मेळाव्यात व्यक्त केले.शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेचा मेळावा व कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम मेटे यांच्या उपस्थितीत पुण्यात राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल, सहकार नगर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मेटे बोलत होते. या मेळाव्यात अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद यांनी शिव-संग्राम पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष शैलेश सरकटे, प्रदेश सचिव शेखर पवार, जिल्हा संपर्क प्रमुख तुषार काकडे, शहराध्यक्ष भरत लगड, माजी विद्यार्थी महेंद्र कडू, किरण ओहोळ, बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते. मेटे म्हणाले की, प्रस्थापित, सत्ताधा-यांनी आतापर्यंत विस्थापित, गोर-गरीब जनतेला अनेक गोष्टींपासून वंचित ठेवले आहे. पण आता शिवसंग्राम पक्षाच्या माध्यमातून राजकीय, समाजिक परिवर्तनाची लाट निर्माण करायची आहे. आगामी काळात पक्षात होणारे विविध व्यक्तींचे प्रवेश पाहून काही व्यक्तींकडून लोकांना वेगळे करण्याचा, संघटना तोडण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, आपण शिवाजीच्या विचाराने एक त्र आलो असल्याने त्याचा काही फरक पडणार नाही. मी देखील आपल्या सामाजिक ,राजकीय जीवनात वैयक्तिक स्वार्थासाठी कधीही सौदागिरी केली नाही. शेतकरी, मराठाच्या जीवावर राजकारण करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसने आपले एकही आश्वासन पाळले नाही. त्यामुळे त्या पक्षातून बाहेर पडलो. आता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसंग्राम पक्ष सर्व ताकदीने निवडणुकामध्ये उतरणार आहे. आज आपले दोन आमदार आहेत. आगामी निवडणुकीत ही संख्या ५ ते १० पर्यंत जाण्याचा निर्धार केला पाहिजे.       ---------------सर्वसामान्यासाठी शिवसंग्राम पक्षात प्रवेश - अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यदकाही वर्षांपूर्वी राजकारणात येईल असा विचार देखील मनात नव्हता. परंतु, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ पक्षाकडून पहिली निवडणूक लढवली. एका महिन्यात सर्व लोकापर्यंत पोहोचू शकले नाही. त्यानंतर पुन्हा कोणत्याही पक्षात प्रवेश करेल असे वाटत नव्हते. पण शिवसंग्राम पक्षाचे व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रुणहत्या आदी स्वरुपाचे काम पाहून या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद यांनी येथे व्यक्त केले. काही लोक मोठ-मोठी आश्वासने देऊन सत्तेत येतात. तर काही सत्तेत राहून एकमेकांचे पाय खेचतात आणि सत्तेचा आनंद देखील घेतात असा टोला देखील लगावला. 

 

टॅग्स :PuneपुणेVinayak Meteविनायक मेटेElectionनिवडणूकBJPभाजपा