मुंबईत शिवसैनिक आपापसात भिडले, किशोरी पेडणेकर- राजेश कुसळेंच्या समर्थकांत वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 16:15 IST2017-10-10T15:17:44+5:302017-10-10T16:15:05+5:30
शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिवसैनिकांमधील गटबाजीमुळे दोन नेत्यांचे कार्यकर्ते आपापसांत भिडले आहेत. नगरसेविका किशोरी पेडणेकर आणि माजी शाखाप्रमुख राजेश कुसळे यांचे समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे.

मुंबईत शिवसैनिक आपापसात भिडले, किशोरी पेडणेकर- राजेश कुसळेंच्या समर्थकांत वाद
मुंबई - शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिवसैनिकांमधील गटबाजीमुळे दोन नेत्यांचे कार्यकर्ते आपापसांत भिडले आहेत. नगरसेविका किशोरी पेडणेकर आणि माजी शाखाप्रमुख राजेश कुसळे यांचे समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. या हाणामारीत दोन शिवसैनिक जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी नायर रूग्णालयात हलवलं आहे. शिवसेनेच्या पक्षसंघटनेत गेल्या काही दिवसांपूर्वी बदल झाला होता. त्यानंतर आज हा वाद उफाळून आला आहे. शिवसेनेत अनेक निष्ठावान शिवसैनिकांना डावललं जात असल्यामुळे वरळी, डिलाईल रोड, भायखळा, प्रभादेवी, लालबाग परळ भागांत अनेक शिवसैनिक नाराज आहेत. त्या नाराजीतून हा वाद उफाळून आल्याची आता चर्चा आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)