शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

एकच धून 6 जून! रायगडावर शिवराज्याभिषेक होणारच; छत्रपती संभाजीराजेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 18:11 IST

रायगड किल्ला असलेला जिल्हा रायगड जरी ऑरेंज झोनमध्ये असला तरीही पुणे, सातारा, मुंबई आदी जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. यामुळे महिनाभरावर येऊन ठेपलेल्या शिवराज्याभिषेक सोहळा होणार की नाही यावर संभ्रम निर्माण झाला होता. आज छत्रपती संभाजीराजे भोसलेंनी यावर भूमिका स्पष्ट केली आहे. 

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही रायगडावरशिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. कोरोनाचे संकट असले तरीही त्यात खंड पडू देणार नसल्याचे छत्रपती संभाजीराजे भोसलेंनी म्हटले आहे. 

देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनावर मात करण्यासाठी राज्यासह देशभरात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. राज्यात आता दिवसाला हजार-बाराशे कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. रायगड किल्ला असलेला जिल्हा रायगड जरी ऑरेंज झोनमध्ये असला तरीही पुणे, सातारा, मुंबई आदी जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. यामुळे महिनाभरावर येऊन ठेपलेल्या शिवराज्याभिषेक सोहळा होणार की नाही यावर संभ्रम निर्माण झाला होता. आज छत्रपती संभाजीराजे भोसलेंनी यावर भूमिका स्पष्ट केली आहे. 

एकच धून 6 जून! असं म्हणत महाराष्ट्राच्या अन देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त कशाचीही पर्वा न करता दरवर्षी  रायगडावर पोहोचत असतात. फक्त महाराजांचा राज्याभिषेक सोहळा डोळ्यांत साठवून घेण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करुन शिवभक्त गडावर येत असतात. गेली 14 वर्षं आपण हा सोहळा अगदी राजवैभवात संपन्न करत आहोत. शिवराज्याभिषेक सोहळा आता लोकोत्सव झाला आहे. देशभर किंबहुना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. गेल्या वर्षी 5 देशांचे राजदूत त्या त्या देशाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून  राजसदरेवर महाराजांना मुजरा करण्यासाठी दाखल झाले होते, असे ट्विट संभाजीराजेंनी केले आहे. 

यावर्षी सुद्धा माझ्या मनात अजून मोठं अन आगळं वेगळं नियोजन होतं. परंतु कोरोनामुळे सर्वत्र परिस्थिती अजूनही गंभीर आहे. कोरोनामुळे, दरवर्षी प्रमाणे शिवभक्तांना इच्छा असूनही लाखोंच्या संख्येने गडावर येता येणार नाही. संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने ते योग्यही आहे. कोरोनाचा संसर्ग अजून किती प्रमाणात वाढेल? लॉकडाऊनचा कालावधी अजून किती दिवस असेल? किती शिवभक्तांना गडावर जाण्याची परवानगी मिळेल? ह्याबाबत स्पष्टता येत नाही आहे. माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. या महिनाअखेरपर्यंत परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे संभाजीराजें म्हणाले. 

शिवराज्याभिषेक सोहळा होणार पण...यानंतर संभाजीराजेंनी शिवराज्याभिषेक सोहळ्यावरील भूमिका मांडली आहे. गेल्या काही दिवसांपासून मी महाराष्ट्रातील विविध भागांतील शिवप्रेमी, इतिहासकार, शिवराज्याभिषेक महोत्सव समिती चे सदस्य, अनेक दुर्गप्रेमी संस्थांचे सदस्य, संबंधित विविध संघटना, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार या सर्वांशी चर्चा करत आहे. निर्णय घेऊन सर्वांना कळवण्यात येईल. सर्व शिवभक्तांना मी एकच शब्द देतो, की महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पाडला जाईल. त्या परंपरे मध्ये खंड पडू देणार नाही. राजसदरेतील राज्याभिषेक सोहळा सर्व शिवभक्तांना थेट पाहता येईल याविषयी सुद्धा उपाय योजना करण्याचा माझा मानस आहे, असे संभाजी राजेंनी म्हटले आहे. 

 

महत्वाच्या बातम्या...

Vidhan Parishad Election: ९ जागांसाठी १० उमेदवार; तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक

Vidhan Parishad Election: ...तर शिवसेनेने एक जागा कमी लढवावी, भाजपाचा युतीधर्मावरून टोला

Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीकडून 'या' नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी

पीओकेवरून तणाव; पाकिस्तानची एफ १६, मिराज लढाऊ विमाने घिरट्या घालू लागली

टॅग्स :Shivrajyabhishekशिवराज्याभिषेकSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीRaigadरायगडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस