शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

CAA: कायद्याला विरोध करणारे देशद्रोही; संभाजी भिडेंची जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 10:16 PM

आपला देश माणसांचा, पण देशभक्तांचा नाही; संभाजी भिडेंकडून विरोधकांचा समाचार

कोल्हापूर: सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशभरात आंदोलनं सुरू आहेत. काही ठिकाणी या आंदोलनांना हिंसक वळणदेखील लागलं आहे. या आंदोलनांवरुन विविध स्तरातून प्रतिक्रिया येत असताना, काहींकडून कायद्याचा निषेध होत असताना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडेंनी या कायद्याचं जोरदार समर्थन केलं आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे देशद्रोही असल्याचं संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. कोल्हापुरात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी कायद्याला विरोध करणाऱ्यांवर तोफ डागली. आपला देश माणसांचा आहे. पण देशभक्तांचा नाही, हे दुर्दैव असल्याचं म्हणत संभाजी भिडेंनी कायद्याला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला. स्वार्थ हाच धर्म असणारे या कायद्याला विरोध करत आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक देशवासीयाला आनंद व्हायला हवा. देशभक्त असणारा प्रत्येक जण या कायद्याला पाठिंबा देईल. या कायद्याला विरोध करणारे देशद्रोही आहेत, असं संभाजी भिडे म्हणाले. शिवसेना सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणार नाही, असं मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केलं. शिवसेनेच्या भूमिकेबद्दल गैरसमज निर्माण केला जात आहे. शिवसेनेकडून या कायद्याविरोधात भाष्य करण्यात आलेलं नाही. शिवसेना या कायद्याबद्दल अगदी योग्य बोलत आहे. त्यांच्या बोलण्यातील बारकावे लक्षात घ्यायला हवे. शिवसेना या कायद्याबद्दल वाईट बोलणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संभाजी भिडेंनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर जोरदार टीका केली. त्या फालतू माणसाबद्दल विचार करुन देशानं आणि जनतेनं वेळ वाया घालवू नये. त्यांचा विचारसुद्धा करू नका. अशी माणसं राजकारणात आली हे देशाचं दुर्दैव आहे, अशा शब्दांत संभाजी भिडेंनी राहुल गांधींवर शरसंधान साधलं.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीShiv SenaशिवसेनाRahul Gandhiराहुल गांधी