शिर्डीला दर्शनासाठी निघालेल्या तरुणांच्या कारला अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 02:28 PM2017-10-03T14:28:34+5:302017-10-03T14:30:32+5:30

शिर्डीला दर्शनासाठी निघालेल्या तरुणांच्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

Shirdi's youth car was hit by accident, one died on the spot, and both were serious | शिर्डीला दर्शनासाठी निघालेल्या तरुणांच्या कारला अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर

शिर्डीला दर्शनासाठी निघालेल्या तरुणांच्या कारला अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर

Next

हिंगणघाट (वर्धा )- चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथून शिर्डीला दर्शनासाठी निघालेल्या तरुणांच्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे तरुण गंभीर जखमी झाले.

येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर वणी (लहान)शिवारात आज मंगळवारी (ता.तीन) पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. निखील मुकुंदराव बुरांडे वय ३० रा. मूल हे अपघातात मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. निखीलचा आज वाढदिवस असल्याने ते आपल्या दोन मित्रांसोबत कार क्रमांक एमएच ०१ ए एक्स ५६२७ ने मूल येथून रात्री १२.३० च्या सुमारास शिर्डीला दर्शनास जाण्याकरिता निघाले होते. दरम्यान येथील वना नदीचा पुलओलांडल्यानंतर ते वर्धा रस्त्याने न जाता रस्ता चुकून राष्ट्रीय महामार्गाने जाण्यास निघाले. सुमारे अर्धा किलोमीटर अंतर पार केल्यानंतर सुगुणा कंपनीजवळ वणी शिवारात अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला जबर धडक दिली. या अपघातात निखीलचा जागीच मृत्यू झाला तर सचिन येनप्रेडीवार (वय ३०) आणि आकाश चुरानी दोघेही रा. मूल हे जखमी झाले. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची हिंगणघाट पोलिसात तक्रार नोंद करण्यात आलेली असून पुढील तपास पोलीस हवालदार प्रेमराज बावणे आणि श्रीकृष्ण भुते करीत आहे.

Web Title: Shirdi's youth car was hit by accident, one died on the spot, and both were serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात