शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
2
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
3
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
4
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
5
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
6
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
7
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
8
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
9
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
10
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
11
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
12
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
13
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
14
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
15
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
16
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
17
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
18
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
19
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
20
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
Daily Top 2Weekly Top 5

वांद्रे येथे अवतरली शिर्डी; साईबाबा समाधीच्या शताब्‍दी वर्षानिमित्‍त वांद्रे येथे खास आरास, शिर्डीतून साईबाबांच्‍या पादुका मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 17:57 IST

दरवर्षी प्रसिध्‍द मंदिराची हुबेहुब प्रतिकृती पाहण्‍याची संधी गणेशभ्‍क्‍तांना उपलब्‍ध करून  देणारे  वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाने यावर्षी शिर्डिच्‍या साईबाबांच्‍या समाधीच्‍या शताब्‍दी निमित्‍त साईबाबांचे समाधी मंदिराची हुबेहुब प्रतिकृती उभारण्‍यात आली आहे.

ठळक मुद्देशिर्डिच्‍या साईबाबांच्‍या समाधीच्‍या शताब्‍दी निमित्‍त साईबाबांचे समाधी मंदिराची हुबेहुब प्रतिकृतीशिर्डितून साईबाबांच्‍या पादूकाही खास भक्‍तांच्‍या दर्शनासाठी दाखल

मुंबई , दि. 25- दरवर्षी प्रसिध्‍द मंदिराची हुबेहुब प्रतिकृती पाहण्‍याची संधी गणेशभ्‍क्‍तांना उपलब्‍ध करून  देणारे  वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाने यावर्षी शिर्डीच्‍या साईबाबांच्‍या समाधीच्‍या शताब्‍दी निमित्‍त साईबाबांचे समाधी मंदिराची हुबेहुब प्रतिकृती उभारण्‍यात आली आहे. तर शिर्डीतून साईबाबांच्‍या पादूकाही खास भक्‍तांच्‍या दर्शनासाठी दाखल झाल्या आहेत.  मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष्‍य आमदार अॅड आशिष शेलार प्रमुख सल्‍लागार असलेल्‍या या मंडळाचे 20  वे वर्ष असून सर्वधर्मियांची वस्‍ती असलेल्‍या या गणेशोत्‍सवात यावर्षी मोठयाप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतील हे लक्षात घेऊन मंडळाचे पदाधिकरी तयारीला लागले असल्‍याची माहिती मंडळाचे अध्‍यक्ष जितेंद्र राऊत यांनी दिली.

शिर्डीतील साईबाबांचे समाधी मंदिराची ही प्रतिकृती सुमारे 60 फुट उंचीची साकारण्‍यात आली असून आजपर्यंत ज्‍या ज्‍या मंदिराच्‍या प्रतिकृती साकारण्‍यात आल्‍या त्‍या भाविकांच्‍या खास आकर्षण ठरल्‍या त्‍याच पध्‍दतीने याही वर्षी भाविकांना ही प्रतिकृती आवडेल,असा विश्‍वास मंडळाच्‍या पदाधिकाऱयांनी व्‍यक्‍त केला आहे. हा गणेशोत्‍सव हिंदु–मुस्लिम सलोखा राखत दरवर्षी साजरा होतो. तर अनेक मुस्लिम कार्यकर्तेही या मंडळात उत्‍साहाने वर्षानुवर्षे सहभागी होतात.

साईबाबांवर श्रध्‍दा असणारे लाखो भाविक मुंबई परिसरात आहेत. तसेच मुंबईत अनेक पदयात्री मंडळेही मोठया प्रमाणात आहेत. या सर्वांना खास आमंत्रण या निमित्ताने देण्‍यात आले आहे.  त्‍यामुळे सबका मालिक एक.. आणि श्रध्‍दा आणि सबुरीचा संदेश देणाऱया साईबाबांच्या मंदिराची रेक्‍लमेशन, बजार रोड येथे साजारा होणाऱ्या या गणेशोत्‍सव मंडळाची आरास ही खास आकर्षण असून गतवर्षी या मंडळाने जेजुरीच्‍या प्रसिद्ध  खंडेरायाच्‍या मंदिरांची हुबेहुब प्रतिकृती  साकारली  होती.  तर त्‍यापुर्वी गोव्‍याच्‍या मंगेशीचे मंदिराची भव्‍य प्रतिकृती साकारली होती तर त्‍या आधी 45 फुट उंच मुरूडेश्वराचे मंदिर आणि त्या मंदिराच्या छतावर साकारण्यात आलेली 22 फुट शंकराची मूर्ती भाविकांचे खास आकर्षण ठरली होती.

यापुर्वी साकारली अनेक ऐतिहासिक मंदिरे-यापुर्वी महाराष्ट्राचे आराद्य दैवत पंढरपूच्या विठ्ठल रखूमाईचे मदिर बांद्रे येथे साकारण्यातआले होते. तर त्यानंतर नाशिकचे काळाराम मंदिर, तूळजापूरचे भवानी मातेचे मंदिर, ज्योतीबाचे मंदिर तर २००९ ला गणपतीपुळयाचे गणपतीचे मंदिराची प्रतीकृती साकारण्यात आली होती. त्यानंतर देवगडमधील कुणकेश्वर, औरंगाबाद येथील भूवणेश्वर आणि कोल्हापूरच्या आंबाबाई मंदिराच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या तसेच. दरवर्षी मंदिराच्या गाभा-यात त्यात्या दैवतांच्या मुर्तीही विराजमान करण्यात आल्या होत्या. शक्तीपीठांच्या या आरासीसह गोंधळ,जागरण वाघ्या मुरळींनाही आमंत्रित करण्यात येते त्यामुळे संध्याकाळी या भव्य मंदिराची देखणी आरास पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी दरवर्षी होते.कर्नाटकातील  45 फुट उंच मुरूडेश्वराचे मंदिर आणि त्या मंदिराच्या छतावर साकारण्यात आलेली 22 फुट शंकराची मूर्ती भाविकांचे खास आकर्षण ठरली होती तर गतवर्षी गोवयाच्‍या श्री देव मंगेशीचे मंदिरही पाहण्‍यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव