शिंगणापूरला लाखो भाविकांची मांदियाळी
By Admin | Updated: December 21, 2014 01:23 IST2014-12-21T01:23:31+5:302014-12-21T01:23:31+5:30
नाताळच्या सुटीची सुरुवात तसेच शनिवारचे औचित्य साधून लाखो भाविकांनी शनि शिंगणापूर येथे गर्दी केली होती. सोनई-राहुरी मार्गावर अनेकदा वाहतूक कोंडी होत होती.

शिंगणापूरला लाखो भाविकांची मांदियाळी
सोनई (जि. अहमदनगर) : नाताळच्या सुटीची सुरुवात तसेच शनिवारचे औचित्य साधून लाखो भाविकांनी शनि शिंगणापूर येथे गर्दी केली होती. सोनई-राहुरी मार्गावर अनेकदा वाहतूक कोंडी होत होती.
कर्नाटकचे शिक्षणमंत्री आर. व्ही. देशपांडे, उत्तर प्रदेशचे मंत्री अभिषेक मिश्रा, ओरिसाचे अर्थमंत्री प्रदीपकुमार अमत, महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार रक्षा खडसे यांनीही शनिदर्शन घेतले. जनसंपर्क कार्यालयात या उभयतांचा उपाध्यक्ष सोपान बानकर, विश्वस्त नितीन शेटे यांनी सत्कार केला.
डोंबिवलीतील शनैश्वर भक्त मंडळातील सुमारे २५० तरुणांनी डोंबिवली ते शनी शिंगणापूर पायी दिंडी आणली. या दिंडीचे येथे ढोल, ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. (वार्ताहर)