शेगावचा युग करणार आज पंतप्रधानांसोबत चर्चा

By Admin | Updated: August 6, 2016 02:10 IST2016-08-06T02:10:57+5:302016-08-06T02:10:57+5:30

शेगावच्या युगची उंच भरारी; देशभरातून आमंत्रित केलेल्या ११ हुशार विद्यार्थ्यांशी पंतप्रधान करणार चर्चा.

Shegaon's era will be discussed today with the Prime Minister | शेगावचा युग करणार आज पंतप्रधानांसोबत चर्चा

शेगावचा युग करणार आज पंतप्रधानांसोबत चर्चा

फहीम देशमुख
शेगाव (जि.बुलडाणा), दि. ५ : मोदी सरकारच्या गुड गव्हर्नंर्स या उपक्रमाला आणखी प्रभावीपणे राबविण्याकामी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी दिल्ली येथे देशभरातून आमंत्रित केलेल्या ११ हुशार विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे. या चर्चेत अग्रक्रमावर शेगावचा युग भुतडा हा विद्यार्थी राहणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विषयांवर दर दोन महिन्यात देशातील हुशार विद्यार्थ्यांना आमंत्रित करुन त्यांच्या कडून चर्चेच्या माध्यमाने त्यांची मते जाणून घेतले. याच धर्तीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशभरातील काही हुशार विद्यार्थ्यांना आमंत्रित केले आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता दिल्ली येथील टाऊन हॉलमध्ये एका ऑनलाइन परीक्षेद्वारे निवडलेल्या ११ विद्यार्थ्यांशी ते ह्यगुड गव्हर्नंर्सह्णया विषयवार चर्चा करणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाकडून या परीक्षेसाठी ३00 सेकंदाचा वेळ देण्यात आला होता. शेगावच्या युग राजेश भुतडा या विद्यार्थ्याने केवळ २२७ सेकंदात सर्व प्रश्न सोडविले. विशेष म्हणजे या परिक्षेत त्याने प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. युग हा सध्या अकोला येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे.

Web Title: Shegaon's era will be discussed today with the Prime Minister