शेगावचा युग करणार उदया पंतप्रधानांसोबत चर्चा
By Admin | Updated: August 5, 2016 18:27 IST2016-08-05T18:27:05+5:302016-08-05T18:27:05+5:30
मोदी सरकारच्या गुड गवर्नेंस या उपक्रमाला आणखी प्रभावीपणे राबविण्याकामी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ हुशार विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे.

शेगावचा युग करणार उदया पंतप्रधानांसोबत चर्चा
- फहीम देशमुख
शेगाव, दि. ५ : मोदी सरकारच्या गुड गवर्नेंस या उपक्रमाला आणखी प्रभावीपणे राबविण्याकामी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी दिल्ली येथे देशभरातून आमंत्रित केलेल्या ११ हुशार विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे. या चर्चेत अग्रक्रमावर शेगावचा युग भूतड़ा हां विद्यार्थी राहणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विषयावर दर दोन महिन्यात देशातील हुशार विद्यार्थ्यांना आमंत्रित करुण त्यांच्या कडून चर्चेच्या माध्यमाने सुझाव घेतले. याच धर्तीवर भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनीही देशभरातील काही हुशार विद्यार्थ्यांना आमंत्रीत केले आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता दिल्ली येथील टाऊन हॉलमध्ये एका आॅनलाइन परीक्षेद्वारे निवडलेल्या ११ विद्यार्थ्यांशी ते गुड गवर्नेंस या विषयवार चर्चा करणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाकडून या परीक्षेसाठी ३०० सेकंदाचा वेळ देण्यात आला होता. शेगावच्या युग राजेश भुतडा या विद्यार्थ्याने केवळ २२७ सेकंदात सर्व प्रश्न सोडविले. विशेष म्हणजे या परीक्षेत त्याने प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. युग हा सध्या अकोला येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे.