शारीरिक सुखासाठी छळणाऱ्या पतीला 'तिने' घडविली अद्दल

By Admin | Updated: September 19, 2016 19:33 IST2016-09-19T19:10:43+5:302016-09-19T19:33:57+5:30

पत्नीची इच्छा नसताना तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करुन त्यासाठी छळ करणाऱ्या नवरोबाला पत्नीने चांगलीच अद्दल घडविली.

She 'made' her husband who is persecuted for physical happiness | शारीरिक सुखासाठी छळणाऱ्या पतीला 'तिने' घडविली अद्दल

शारीरिक सुखासाठी छळणाऱ्या पतीला 'तिने' घडविली अद्दल

ऑनलाइन लोकमत
बीड, दि. १९ :  पत्नीची इच्छा नसताना तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करुन त्यासाठी छळ करणाऱ्या नवरोबाला पत्नीने चांगलीच अद्दल घडविली. त्याच्याविरुद्ध पत्नीने थेट पोलिसांत तक्रार केली असून तो सध्या फरार आहे. केज तालुक्यात सोमवारी हा प्रकार समोर आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुरंबी (ता. केज) येथील विकास भरत कर्वे या तरुणाशी एका तरुणीचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून तिचा सासरच्यांकडून छळ सुरु होता. मात्र, सुखी स्वप्न रंगवत तिने हा छळ निमूटपणे सहन केला. पती विकासकडे ही तिने तक्रार केली; परंतु त्याने दुर्लक्ष केले. शिवाय तो स्वत: इच्छेविरुद्ध तिचा लैंगिक छळ करत असे. त्यामुळे २० वर्षीय विवाहिता निराश झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ती त्रासाला कंटाळून माहेरी गेली होती. शेवटी तिने रविवारी बर्दापूर ठाणे गाठून रितसर फिर्याद दिली.

पती विकासने इच्छेविरुद्ध लैंगिक छळ केला तर सासू पुष्पा भरत कर्र्वे, सासरा भरत कर्वे, दीर वैजीनाथ कर्वे, जाऊ रंजना कर्वे, हनुमंत कर्वे, जाऊ मनीष कर्वे यांनी घर बांधण्यासाठ माहेरहून तीन लाख रुपये आणत नाही म्हणून मारहाण करुन शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद आहे. सर्व आरोपी फरार असून बर्दापूर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: She 'made' her husband who is persecuted for physical happiness