शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

शरद पवार यांची कोरेगाव भीमा आयोगापुढे २३ फेब्रुवारीला साक्ष; संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्याही साक्षी नोंदविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 07:56 IST

आयोगाने शरद पवार यांच्याशिवाय तत्कालीन पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) सुवेज हक, तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पाखळे आणि तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनाही २१ ते २५ फेब्रुवारीच्या दरम्यान साक्ष देण्यासाठी हजर राहण्यास सांगितले आहे. 

मुंबई : जानेवारी २०१८मध्ये पुण्यातील कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी आयोगाने साक्ष नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना २३ व २४ फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. याआधी २०२०मध्येही पवार यांना साक्ष देण्यासाठी आयोगापुढे हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, कोरोनाच्या कारणास्तव पवार आयोगापुढे साक्ष नोंदवू शकले नाहीत.आयोगाने शरद पवार यांच्याशिवाय तत्कालीन पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) सुवेज हक, तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पाखळे आणि तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनाही २१ ते २५ फेब्रुवारीच्या दरम्यान साक्ष देण्यासाठी हजर राहण्यास सांगितले आहे. कोलकाता उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल व राज्याचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक हा द्विसदस्यीय आयोग या प्रकरणाची चौकशी करत आहे.पुणे  पोलिसांच्या म्हणण्यानुसार, १ जानेवारी  २०१८ रोजी कोरेगाव भीमा द्विशताब्दी वर्धापन दिनादिवशी  विजयस्तंभाजवळ दोन समूहांमध्ये जातीय दंगल उसळली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर १० पोलीस जखमी झाले. ३१ जानेवारी २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाड्यात एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत झालेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे कोरेगाव भीमा येथे जातीय दंगल उसळली. काय म्हणाले होते पवार...हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे  संभाजी भिडे यांनी कोरेगाव भीमा व आजूबाजूच्या परिसरात वेगळे वातावरण निर्माण केले. तसेच पुणे पोलीस आयुक्तांची भूमिका संशयास्पद असून, त्यासंदर्भात तपास करायला हवा, असे विधान पवार यांनी माध्यमांशी बोलताना केले होते. फेब्रुवारी २०२०मध्ये ‘विचार मंच’ या सामाजिक गटाने शरद पवार यांची साक्ष नोंदविण्यात यावी, यासाठी आयोगापुढे अर्ज केला आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPoliceपोलिसBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार