शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

यावेळी निश्चितच शरद पवारांचा स्ट्राइकरेट सर्वात जास्त, पण याचा अर्थ असा नाही...; संजय राऊत स्पष्टच बोलले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 13:48 IST

"अद्याप जागावाटपासंदर्भात चर्चाही सुरू झालेली नाही. सर्वांचा वाटा बरोबरीचा आहे. कोण किती जागा लढवेल, हे कोण कुठे जिंकेल यावर अवलंबून आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे."

राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यातच, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यासोबत आघाडी टिकावी यासाठी पक्षाने कमी जागांवर निवडणूक लढवली. मात्र विधानसभेला चित्र वेगळे असेल, असे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष प्रशांत जगपात यांनी म्हटले होते. यावर आता, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. अद्याप जागावाटपासंदर्भात चर्चाही सुरू झालेली नाही. सर्वांचा वाटा बरोबरीचा आहे. कोण किती जागा लढवेल, हे कोण कुठे जिंकेल यावर अवलंबून आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राऊत म्हणाले, "अद्याप जागावाटपासंदर्भात चर्चाही सुरू झालेली नाही. ना एनसीपी सोबत ना काँग्रेससोबत. त्यामुळे कोण किती जागा लढणार हा प्रश्नच येत नाही. सर्वांचा वाटा बरोबरीचा आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीने एकत्रितपणे निवडणूक लढून, एकतेची ताकद काय असते, हे संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. आम्ही महाराष्ट्राने आणि उत्तर प्रदेशने मोंदींचे बहुमत रोखले आहे. आमची बोलणी लवकरच सुरू होईल. आम्ही २५ तारखेलाच चर्चेसाठी बसणार होतो. मात्र, काँग्रेसची दिल्लीत काही महत्वाची बैठक आहे. यासाठी महाराष्ट्रतील सर्वच नेते दिल्लीला जाणार आहेत. यामुळे महाविकास आघाडीची २५ तारखेला होणारी बैठक आम्ही पुढे ढकलली आहे. 

पवारांनी १० जागा लढल्या आणि ८ जिंकल्या, याचा अर्थ... -"आता विधानसभा आणि संसदेचे आधिवेश झाल्यानंत आम्ही पुन्हा बसू आणि चर्चा करू. कोण किती जागा लढवेल, हे कोण कुठे जिंकेल यावर अवलंबून आहे. यावेळी निश्चितच शरद पवारांचा स्ट्राइकरेट सर्वात जास्त आहे. पवारांनी १० जागा लढल्या आणि ८ जिंकल्या. याचा अर्थ असा नाही... शिवसेनेने ९ जागा जिंकल्या, पण शिवसेनेला सर्वात जास्त टार्गेट करण्यात आलं होतं," असेही राऊत म्हणाले.

मुंबईच्या एका जागेवर भाजप आणि शिंदे गटाने डाका टाकला -"आम्ही २१ जागा लढवल्या. त्यांपैकी ९ जिंकल्या. मुंबईच्या एका जागेवर भाजप आणि शिंदे गटाने डाका टाकला आहे. ती जागाही आम्ही जिंकलो होतो. दोन तीन जागा अशा आहेत जेथे आम्ही फार कमी फरकाने हारलो. त्यामुळे आमचाही स्ट्राइकरेट चांगला आहे. काँग्रेसचाही चांगला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात २८८ जागा आहेत. कुणाला काहीही कमी पडणार नाही. सर्वजण आरामात लढतील," असेही राऊत यांनी म्हटले आहे.

पुण्यात शरत पवारांनी पक्ष कार्यकर्त्यांसोबत घेतली बैठक -शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यात २ बैठका घेतल्या. पहिली बैठक पुणे शहर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांची होती तर दुसरी बैठक आमदार आणि नवनियुक्त खासदारांची होती. पीटीआयनुसार, पहिल्या बैठकीत सहभागी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष प्रशांत जगपात यांनी म्हटले होते की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यासोबत आघाडी टिकावी यासाठी पक्षाने कमी जागांवर निवडणूक लढवली. मात्र विधानसभेला चित्र वेगळे असेल. या बैठकीत, पुणे, बारामती, मावळ, शिरुर लोकसभेत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यावेळी विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांनी बैठकीत संकेत दिल्याचे बोलले जाते.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी