शरद पवार यांचा ‘कृतज्ञता’ सत्कार

By Admin | Updated: March 1, 2017 02:02 IST2017-03-01T02:02:01+5:302017-03-01T02:02:01+5:30

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांचा ‘कृतज्ञता’ सत्कार करण्यात येणार आहे.

Sharad Pawar's 'Grateful' felicitation | शरद पवार यांचा ‘कृतज्ञता’ सत्कार

शरद पवार यांचा ‘कृतज्ञता’ सत्कार


मुंबई : सुप्रसिद्ध कवी ना.धों. महानोर अमृत महोत्सवानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांचा ‘कृतज्ञता’ सत्कार करण्यात येणार आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात शनिवारी, ४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्यात ज्येष्ठ साहित्यिक रामदास भटकळ, ज्येष्ठ विचारवंत शरद काळे आणि हेमंत टकले यांची प्रमुख उपस्थिती असेल.
सांस्कृतिक स्वरूपाच्या या कार्यक्रमात महानोरांचे वेगळेपण सांगणारी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडणारी व त्यांच्या साहित्याचे रसग्रहण करणारी काही मनोगते दृक्श्राव्य स्वरूपात सादर करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात कवितांचे अभिवाचन श्रीरंग देशमुख, अमृता मोरे, हेमंत टकले आणि दत्ता बाळसराफ यांच्याकडून करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sharad Pawar's 'Grateful' felicitation