शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी दिलेल्या 'त्या' ऑफरवर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 20:28 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मुंबईः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मोदींनी एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती, तसेच सुप्रिया सुळेंनाही मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यास मला आनंद होईल, असं मोदींनी सांगितलं होतं. एबीपी माझानं घेतलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दोन अटी अमान्य केल्याने महाराष्ट्रात भाजपाची सत्तास्थापनेची संधी हुकल्याची बातमी अनेक वृत्तवाहिन्यांनी दिली होती, त्यावरच शरद पवारांनी खुलासा केला. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्तास्थापनेसाठी भाजपासोबत जाण्यास तयारी होती, मात्र त्यांच्या दोन अटी होत्या. त्यासाठी भाजपा नेतृत्वाने नकार दिला होता, एकत्र सरकार स्थापन करणे शक्य झाले नसल्याचे वृत्त अनेक वृत्तवाहिन्यांनी दिले होते. त्यावरच शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या सगळ्या घडामोडींवर पवारांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. मोदींनी एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती. तुमच्यासोबत काम करण्यास मला मनापासून आनंद होईल, असं मोदींनी सांगितलं होतं. तसेच सुप्रिया सुळेंनाही मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यास मला आनंद होईल, असंही ते म्हणाले होते, पण मी त्यांना सांगितलं एकत्र काम करणं राजकीयदृष्ट्या मला शक्य नाही. मला भाजपानं राष्ट्रपतीपदाची ऑफर दिलेली नव्हती, हे काही खरं नाही, माझ्या मनातही तसं नव्हतं, असंही पवारांनी स्पष्ट केलेलं आहे.   शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आपल्या अटी सांगितल्या होत्या. यात केंद्रात सक्रिय असलेल्या आपल्या कन्या सुप्रिया सुळे यांना केंद्रीय कृषी मंत्रिपद द्यावे आणि राज्यातील नेतृत्व बदलावे. तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी नको, अशी मागणी केली होती. मात्र या दोन्ही मागण्यांसाठी भाजपाने नकार दिला होता, असं वृत्त अनेकांनी दिलं होतं. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आलं. त्याच पार्श्वभूमीवर पवारांनी केलेल्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीSupriya Suleसुप्रिया सुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019