शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

शरद पवारांचे आरोप निराधार, ते राष्ट्रवादीच्या बदनामीचा प्रयत्न करतायत; अजित पवार गटाचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 13:41 IST

अजित पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांना धमकावलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. या आरोपावर आता पलटवार करण्यात आला आहे.

Ajit Pawar Vs Sharad Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्यास सुरुवात झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. यादृष्टीने अजित पवार यांनी प्रचारालाही सुरुवात केली असून मला एकटं पाडू नका, असं आवाहन ते बारामतीकरांना करत आहेत. मात्र त्याचवेळी विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांच्याकडून धमकावलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. याबाबत माझ्याकडे तक्रारी येत असल्याचं काही दिवसांपूर्वी पवार म्हणाले. शरद पवारांच्या या आरोपाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

"कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा शरद पवार साहेब यांनी केलेल्या आरोपास कसलाही आधार नसून राष्ट्रवादीची प्रतिमा मलीन करण्यासाठी त्यांनी हा आरोप केला आहे. हे आरोप राजकीय हेतून प्रेरित आहेत," असा पलटवार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उन्मेश पाटील यांनी केला आहे. तसंच याबाबत निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.

रोहित पवारांनीही केला होता गंभीर आरोप

बारामतीत आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या पक्षातील लोक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही केला होता. "अनेक वर्षांपासून पवार कुटुंबावर असलेल्या बारामतीकरांच्या प्रेमाच्या कर्जातून कधीही उतराई होता येणार नाही. पण याची जाणीव ठेवण्याऐवजी आज आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने कुणी बोललं किंवा सोशल मीडियात व्यक्त झालं तर त्याला नोकरीवरून काढण्याचा आणि त्याच्यावर दादागिरी करण्याचा उद्योग मलिदा गँग करत आहे. आजवर कधी असं घडलं नाही, पण विचारांच्या आणि निष्ठेच्या बाजूने असलेल्या लोकांचे रोजगार घालवले जात असतील तर अनेकांना राजकीय बेरोजगार करण्याची ताकदही याच बारामतीकरांमध्ये आहे, हे कुणाच्यातरी तालावर नाचणाऱ्या मलिदा गँगनेही लक्षात ठेवावं," असा इशारा रोहित पवारांनी दिला होता.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामती