शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 08:52 IST

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका संपताच शरद पवार दुष्काळी दौऱ्यावर असून ग्रामीण भागातील परिस्थितीचा ते आढावा घेत आहे.

बीड - संपूर्ण राज्यात यावर्षी १९७२ पेक्षा भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून दुष्काळग्रस्त भागातील जनतेला सगळ्यांनी मिळून मदत कशी करता येईल याचे नियोजन करण्याची गरज आहे. यासाठीच आपण राज्यातील दुष्काळी भागातील पाहणी करीत असून यासाठी उपाययोजना सुचवण्या संदर्भात आपण येत्या आठ दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी सांगितले. बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथे  पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका संपताच शरद पवार दुष्काळी दौऱ्यावर असून ग्रामीण भागातील परिस्थितीचा ते आढावा घेत आहे. सोमवारी सकाळपासून बीड जिल्ह्यात जिल्ह्यातील आष्टी, पाटोदासह अनेक गावांना त्यांनी भेट दिली. शेतकऱ्यांशी यावेळी त्यांनी संवाद साधला. ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांसाठी चारा-पाण्याची टंचाई, सरकारने केलेली टँकर व्यवस्था याची पवारांनी माहिती जाणून घेतली.

पिण्यासाठी दुषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. कामे नसल्याने नागरिकांच्या हाताला रोजगार नाही. अनेक शेतकर्‍यांना पीक विमा मिळालेला नाही. अशा चारही बाजूने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळेच, अशा भिषण परिस्थितीत कोणतेही राजकारण न करता सरकारने शेतकर्‍यांना मदत करावी अशी मागणी शरद पवार यांनी केली.

राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आपण, राज्य आणि केंद्र सरकार समोरही मांडणार आहे. त्यासाठी, येत्या ८ दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी स्वतः भेट घेणार असल्याचे शरद पवार म्हणाले

 

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdroughtदुष्काळ