शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

'Electoral Bond' मधून NCP च्या खात्यात ६५ कोटी; कोण आहेत देणगीदार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 15:38 IST

सध्या देशभरात Electoral Bonds हा विषय चांगलाच चर्चेत आला आहे. बॉन्डच्या माध्यमातून अनेक राजकीय पक्षांच्या देणगीदारांची नावे समोर आलीत. कोणत्या पक्षाला किती आणि कोणी देणगी दिले हे उघड झालं आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही मिळालेल्या देणगीची रक्कमही समोर आली आहे.

मुंबई - Electoral Bonds to NCP ( Marathi News ) सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर इलेक्टोरल बॉन्डची माहिती एसबीआयनं जारी केली आहे. त्यानंतर आता ही सगळी माहिती निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर जाहीर केलीय. या इलेक्टोरल बॉन्डमधून महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनाही मिळालेल्या देणगीचे आकडेही समोर आलेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बॉन्डच्या माध्यमातून ६५.६ कोटी रुपये मिळाल्याची माहिती आहे. 

गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला २०१८ ते जानेवारी २०२४ या कालावधीत जवळपास ६५.६ कोटी रुपये इलेक्टोरल बॉन्डमधून मिळाले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, पक्षाला ५०.५ कोटी रुपये बॉन्डच्या माध्यमातून मिळालेत. २०१९ पर्यंत आम्हाला ३१ कोटी आणि त्यानंतरच्या काळात २० कोटी असे मिळून ५० कोटीच्या आसपास देणगी मिळाली. त्यातील बहुतांश रक्कम ही २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आम्ही खर्च केली. आता आमच्याकडे फक्त ७ लाख रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे ६५ कोटी आकडा कसा आलाय याबाबत मला काही कल्पना नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडून माहिती घेऊ असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीपर्यंत सर्व व्यवहार पार पडले. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये फूट पडल्यानंतर  फुटलेला गट आम्हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा करत होती. त्यामुळे SBI ला पत्र पाठवून ते खाते गोठवण्यात आले. आता आम्हा दोघांचे वेगवेगळी खाती आहेत अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली. तर पैशांबाबतचे सर्व व्यवहार हे पक्षात फूट पडण्यापूर्वीचे आहेत. आता आमच्या पक्षाकडे कुठलेही इलेक्टोरल बॉन्ड नाहीत. त्यामुळे बॉन्डचा आणि आमच्या पक्षाचा काही संबंध नाही. परंतु पुढील काळात आम्ही पक्षासाठी देणगीदार मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत असं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं. ही बातमी TOI ने दिली आहे. 

दरम्यान, NCP एकत्र असताना शरद पवारांच्या उद्योगपती मित्रमंडळींकडून पक्षाला देणगी मिळत होती. त्यात बहुतांश पुण्यातील कंपन्या आहेत. Neotia फाऊंडेशन, भारती एअरटेल, सायरस पुनावाला, युनायटेड शिपर्स, वादग्रस्त बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, बजाज फायनान्स, अतुल चोरडिया, ओबेरॉय रियॅलिटी, अभय फिरोडिया यासारख्या देणगीदारांचा समावेश आहे. या सगळ्या देणगीदारांचा खुलासा मे २०१९ पर्यंत निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीतून झाला आहे. 

बांधकाम आणि रिअल इस्टेटमधून सर्वाधिक देणगी

राष्ट्रवादी काँग्रेसला २८.५ कोटींचा इलेक्टोरल बॉन्ड हा एप्रिल २०१९ पासून बँक खाती गोठवण्यापर्यंत मिळाला आहे. त्यातील मोठे देणगीदार Qwik Supply Chain कंपनीकडून १० कोटी, इंडिगोचे राहुल भाटिया ३.८ कोटी, टोरंट पॉवर कंपनी ३.५ कोटी आणि मगरपट्टा टाऊनशिप डेव्हलपमेंट ३ कोटी इतके मिळाले आहेत. तर इतर छोट्या देणगीदारांमध्ये महालक्ष्मी विद्युत, नांदेड सिटी डेव्हलपमेंट आणि कन्स्ट्रशन, अंबुजा हाऊसिंग अँन्ड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर. चंदा इन्वेस्टमेंट अँन्ड ट्रेडिंग आणि गोवा कार्बन अशा विविध बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांकडूनही देणगी मिळाली आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटीलsunil tatkareसुनील तटकरे