शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मतांसाठीच शरद पवारांकडून इंदू मिलची पाहणी; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 10:11 IST

पक्ष म्हटल्यावर राजकारण हे करणे आलेच. परंतु, राष्ट्रवादीला याचा काहीही फायदा होणार नाही. मतदार नेहमी पक्ष पाहतात. त्यामुळे त्यांनी खुशाल प्रयत्न करावे, असा सल्लाही प्रकाश आंबेडकरांनी दिला. 

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची इंदू मिल येथील भेट निव्वळ राजकीय भेट होती. राष्ट्रवादी काँग्रेसची अनुसूचित जातीच्या मतदारांना आपल्याकडे आकर्षीत करायची योजना आहे. त्यामुळेच पवारांनी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

शरद पवार यांनी बुधवारी इंदू मिल येथील प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेची पाहणी केली. याआधी आजित पवार यांनी देखील स्मारकाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. या सर्व घडामोडीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनुसूचित जातींची मते नाहीत. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला ही मते मिळाली नाहीत. ही बाब दोन्ही पक्षांच्या लक्षात आली आहे. या मतदारांना आकर्षीत करण्यासाठी राष्ट्रवादीने इंदू मिलच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शरद पवार यांनीही इंदू मिलमधील स्मारकाच्या जागेची पाहणी केल्याचा  दावा प्रकाश आंबेडकरांनी केला.

दरम्यान पक्ष म्हटल्यावर राजकारण हे करणे आलेच. परंतु, राष्ट्रवादीला याचा काहीही फायदा होणार नाही. मतदार नेहमी पक्ष पाहतात. त्यामुळे त्यांनी खुशाल प्रयत्न करावे, असा सल्लाही प्रकाश आंबेडकरांनी दिला.