शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 19:02 IST

'युगेंद्र पवार आणि अजित पवार यांची तुलना होऊ शकत नाही. त्यांच्या जास्त जागा आल्या, हे मान्य करावे लागेल.'

Sharad Pawar on Maharashtra Assembly Election Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला न भूतो न भविष्यती असे महाप्रचंड यश मिळालं. 288 पैकी महायुतीने 230+ जागा मिळवल्या, तर महाविकास आघाडीला फक्त 47 जागांवर समाधान मानावं लागलंय. यातही सर्वात मोठा हादरा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बसला. 86 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या पक्षाला फक्त 10 जागा मिळाल्या. या पराभवानंतर पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज अखेर मौन सोडलं. 

मी घरी बसणार नाही...कराडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणतात, 'काल निकाल लागला अन् आज मी कराडमध्ये आलोय. असा निकाल लागल्यानंतर एखादा घरी बसला असता. पण मी घरी बसणार नाही. आमच्या तरुण पिढीला हा निकाल लागेल, असं वाटलं नव्हतं. त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे, त्यांना पुन्हा नव्यानं उभं करणं गरजेचं आहे. कर्तृत्वान पिढी उभारणं, हा माझा यापुढे कार्यक्रम राहील,' असं शरद पवार म्हणाले. 

मतांचं ध्रुवीकरण झालं...निकाबाबत बोलताना शरद पवारांनी लाडकी बहीण योजनाचा उल्लेख केला. ते म्हणाले, 'लाडक्या बहिणांना काही रक्कम देण्यात आली आहे. यापुढे आम्ही सत्तेत आलो नाही, तर ही योजना बंद होईल, असा प्रचार महायुतीकडून करण्यात आला. त्यामुळे लोकांनी आमच्या विरोधात मतदान केले, असे वाटते. दुसरीकडे या निवडणुकीत महिलांचे मतदान वाढले आहे, असे आकडेवारीवरुन दिसत आहे. तो फायदा महायुतीला मिळाला आङे. ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेमुळे मतांचे ध्रुवीकरण झाले, त्याचा फायदाही महायुतीला झाला.'

EVM ची माहिती घेऊन बोलेन...निकालानंतर उद्धव ठाकरेंसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी निकालांवर संशय व्यक्त करत EVM चा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, 'जोपर्यंत माझ्याकडे अधिकृत माहिती येत नाही, तोपर्यंत मी या विषयावर काही बोलणार नाही.' विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर शरद पवार निवृत्ती होणार? ही चर्चा सुरु झाली. त्या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणतात, 'माझ्या निवृत्तीची वेळ विरोधकांनी सांगू नये.'

अजितदादांच्या विजयावर शरद पवार म्हणतात...अजित पवारांच्या पक्षाला जादा जागा मिळाल्या, यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, 'युगेंद्र पवार आणि अजित पवार यांची तुलना होऊ शकत नाही. अजितदादांच्या जागा जास्त आल्या आहेत, हे अमान्य करण्याची गरज नाही. पण राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे, हे महाराष्ट्राला माहीत आहे. कुणीतरी बारामतीत उभं राहणं गरजेचं होतं. तिथं कुणीलाही उभं केलं नसतं, तर महाराष्ट्रात मेसेज काय गेला असता. युगेंद्र आणि अजितची तुलना होऊ शकत नाही, हे आम्हाला माहीत होतं. अजित पवार यांचं अनेक वर्षापासूनचं राजकारण, सत्तेतील सहभाग आणि दुसऱ्या बाजूला नवखा तरुण हे आम्हाला माहीत आहे, असं शरद पवार म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAjit Pawarअजित पवार