शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 19:47 IST

Sharad Pawar Reaction Over Mukhyamantri Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा परिणाम होईल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar Reaction Over Mukhyamantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यभरात चर्चा सुरू आहे. या योजनेची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून यात नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यावर १५०० रुपये देण्यात येतात. तसेच या योजनेतून १ कोटी ५९ लाख महिलांच्या खात्यात दोन महिन्यांची रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे. या योजनेत नोंदणी करणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे, या योजनेवरून महाविकास आघाडीतील नेते महायुती सरकार टीका करत असून, दुसरीकडे महाविकास आघाडीचे सरकार आल्यास याच योजनेची रक्कम दुप्पट करण्याचे शब्द विरोधकांकडून दिले जात आहेत. याबाबत आता शरद पवार यांनी सूचक विधान केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन टर्म झाल्या, आता तिसरी टर्म सुरु आहे, इथे येऊन या योजनेचे कौतुक करुन गेले, त्या काळात त्यांना बहि‍णींच्या व्यथा अन् दु:ख दिसले नाही का, उद्धव ठाकरेंच्या सरकारचा काळ सोडता इथे त्यांची सत्ता आहे, त्या काळात बहि‍णींचे दु:ख दिसले नाही का, असे एकामागून थेट सवाल शरद पवार यांनी केले आहे. 

राज्यातील महिलांना सुरक्षा देणे गरजेचे आहे

राज्यातील महिलांना सुरक्षा देणे गरजेचे आहे. दररोजचे वर्तमान पत्र पाहिले, तर महिलांवर अत्याचार ही बातमी नित्याची झालेली आहे. ती क्लेशदायक आहे. खऱ्या अर्थाने बहि‍णींना सुरक्षेची सन्मानाची गरज आहे. पैसे देऊन टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात जाहिरात देऊन तुम्ही त्यांच्याबद्दलची आस्था दाखवत नाही, महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत, वाढलेले आहेत, असा दावा शरद पवारांनी केला. 

राज्यातील बहिणी बेरोजगारी, महागाईचा विचार करतील

लाडकी बहीण योजनेचे पैसे एक कोटी आणि अधिक महिलांना वाटल्याचे म्हणतात. अजून दोन हप्ते देतील. लाडकी बहीण योजनेचा परिणाम थोडासा होईल, फार काही होणार नाही. समाजात, लोकांच्यात, बहि‍णींच्या घरात बेकारीचा प्रश्न आहे, महागाई, महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न आहे. विकासाबाबत भरीव कामगिरी आहे, असे काही दिसत नाही. राज्यातील बहिणी बेरोजगारी, महागाईचा विचार करतील. गावागावात जातो, मेळावा घेतो, बहि‍णींशी संवाद करतो, त्या अनेक प्रश्न प्रकर्षाने मांडतात, लाडकी बहीण योजनेचा फार परिणाम जाणवणार नाही, पैशांचा परिणाम थोडाफार होईल पण त्यांचे राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती नाही, असे शरद पवार म्हणाले. ते एका मुलाखतीत बोलत होते. 

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुती