शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 16:07 IST

Sharad Pawar News: उद्याच्या हिंदुस्थानचे चित्र कसे बदलणार आणि नवीन काय करणार, याबाबत प्रधानमंत्री अवाक्षर काढत नाही. केवळ टीका करत राहतात, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar News: देशाचे प्रधानमंत्री  महाराष्ट्रात आल्यानंतर दोन लोकांवर बोलतात. एक शरद पवार आणि दुसरे आहेत आमचे उद्धव ठाकरे. या ठाकरेंवर, शिवसेनेवर टीका करायची, माझ्यावर टीका करायची.  माझ्यावर त्यांनी सांगितले काय? महाराष्ट्रामध्ये एक माणूस ४५ वर्ष महाराष्ट्रात फिरतोय आणि लोकांचे सरकार अस्थिर करतोय, ही गमतीची गोष्ट आहे.  महाराष्ट्रात मी फिरतोय, माझे राज्य आहे, माझे लोक आहेत, त्यांच्यासमोर  जाणार, त्यांच्याबरोबर बोलणार हा लोकशाहीचा माझा अधिकार, पण ते सुद्धा सहन  होत नाही. त्यासाठी त्यांची टीका टिप्पणी आम्हा लोकांवर अधिक आहे, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्रात प्रचारसभा घेत आहे. या सभांमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शाह हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेचा समाचार शरद पवार यांनी एका प्रचारसभेत बोलताना घेतला. महाराष्ट्राची निवडणूक आहे, आणि ती निवडणूक पाच टप्प्यात आहे. अशी गंमतीची  गोष्ट आहे. तमिळनाडू राज्य. तिथे एकंदरीत खासदारांची संख्या ४०. आणि ४०  जणांची निवडणूक एका दिवशी. महाराष्ट्राच्या खासदारांची संख्या ४८. इथली  निवडणूक पाच दिवसांची, उत्तर प्रदेशची निवडणूक एका दिवसात आणि  महाराष्ट्राची ५ दिवसांत. हे कशासाठी, अशी विचारणा शरद पवार यांनी केली.

ही निवडणूक नियमानुसार होत असली तरी समान संधी मिळत नाही

या देशाचे  प्रधानमंत्री, ज्यांना जिथे आपली शक्ती कमी असे वाटते, त्या ठिकाणची  निवडणूक एकाऐवजी ४-४ दिवस आणि त्यांना टिका टिप्पणीच करता येते. अनेक ठिकाणी ते सभा घेतात. सभा घ्यायला काही  हरकत नाही, पण एका पक्षाला तुम्ही १० वेळेला सभा घ्यायला संधीही देता आणि  काही पक्षांना एका दिवसात संपवा म्हणून सांगता. याचा अर्थ ही निवडणूक  नियमानुसार होत असेल, पण समान संधी याठिकाणी मिळत नाही. अनेक प्रश्न पुढे आहेत. कुणीही आणि विशेषत: प्रधानमंत्री असेल, अशा  व्यक्तीने दोन गोष्टी करायच्या असतात. एक उद्याच्या हिंदुस्थानचे चित्र आम्ही कसे बदलणार आहोत, नवीन काय करणार आहोत आणि मग टीका टिप्पणी करायची  असेल तर ती करता येते, असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, देशाचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांनी स्वच्छ प्रामाणिकपणाने वस्तुस्थिती सांगायला हवी. ती न सांगता इतरांवर टीका करायची आणि चुकीच्या गोष्टी सांगायच्या. ते सांगतात, आमच्या हातात  सत्ता आली की, भ्रष्टाचार खत्म करू. आज काय चित्र दिसतेय? सर्वत्र  भ्रष्टाचार, आणि त्या भ्रष्टाचाराची जबाबदारी सत्ताधारी पक्षाला चालत आहे.  आज सत्तेचा गैरवापर करणे ही भूमिका आजच्या भाजप सरकारची आहे, अशी टीका शरद पवारांनी केली.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदी