शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

PM मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 16:15 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त (NCP Foundation Day) आयोजित कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देशरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनराष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही - शरद पवारहे सरकार पुढील पाच वर्षे टिकेल - शरद पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त (NCP Foundation Day) आयोजित कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी मराठा व ओबीसी आरक्षण, महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली भेट यांसारख्या अनेक मुद्द्यांवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य करत भूमिका मांडली. (sharad pawar reaction over pm narendra modi and uddhav thackeray meet)

आपण राज्याला वेगळ्या विचारांचे सरकार दिले आहे. हे सरकार पुढील पाच वर्षे टिकेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी शिवसेनेचे कौतुक करत तो विश्वासाचा पक्ष असल्याचे म्हटले आहे. हे सरकार नुसते काम करणार नाही, तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रिक काम करून सामान्य जनतेचे देशात आणि राज्या प्रतिनिधित्वही करेल यात शंका नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले. 

शिवसेना विश्वास असणारा पक्ष, बाळासाहेबांनीही इंदिरा गांधींना दिलेला शब्द पाळला होता 

एकांतात मोदींची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. त्यावेळी एकांतात मोदींनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली. तेव्हा अनेक शंका घेण्यात आल्या. पण शिवसेना विश्वासाचा पक्ष आहे. शिवसेनेसोबत आपण कधी काम केले नाही पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे, असे शरद पवार यांनी नमूद केले. जनात पक्षाचे राज्य आले, त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेस पराभूत झाली. असे असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला तो म्हणजे शिवसेना. शिवसेनेने इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाही, असा निर्णय घेतला, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.

“कोणतीही डील करून नाही तर देशहितासाठी भाजपमध्ये आलोय”: जितीन प्रसाद

राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही

सलग १५ वर्ष सत्तेत होतो मग त्यानंतर सत्ता गेली. त्या काळात काही नेत्यांनी पक्ष सोडला पण त्यामुळे अनेक नवीन नेतृत्व तयार झाले. त्या आधी त्यांचे कतृत्व कधी दिसले नाही पण या आता ते जबाबदारीने आपले काम करत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही, अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली. सत्ता ही केंद्रीत व्हायला नको. तसे झाले तर ती भ्रष्ट होते. सत्ता ही अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला आपण या सत्तेचा भाग असल्याची जाणीव झाली पाहिजे. राष्ट्रवादीचा प्रवास बघता, पक्षाने महाराष्ट्रात नेतृत्वाची फळी निर्माण केली आहे, असे शरद पवार म्हणाले. 

टॅग्स :Politicsराजकारणprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस