शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

"काही शहाणपणाचे..."; लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 15:10 IST

Lok Sabha Session 2024 : लोकसभेत खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीमधून शपथ घेत सुजय विखे पाटील यांना प्रत्युत्तर दिल्याचे म्हटलं जात आहे.

Nilesh Lanke Oath : १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात महाराष्ट्राच्या ४८ खासदारांनी शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनीही शपथ घेतली. निलेश लंके यांनी संसदेत इंग्रजीमधून शपथ घेतली. लंकेंच्या या शपथविधीची सध्या महाराष्ट्राच्या राजकारण जोरदार चर्चा सुरु आहे. निलेश लंके यांनी इंग्रजीमधून शपथ घेतल्याने त्यांनी विरोधक सुजय विखे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल्याचे म्हटलं जात आहे. तसेच निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी भाष्य केलं.

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघात निलेश लंके यांनी भाजप उमेदवार सुजय विखे यांचा २८ हजार मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीची सगळीकडे जोरदार चर्चा होती. प्रचारादरम्यान सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली होती. इंग्रजी भाषेवरुनही सुजय विखे यांनी निलेश लंके यांची खिल्ली उडवली होती. निलेश लंके यांनी माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवल्यास मी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेईन, असं देखील सुजय विखे म्हणाले होते. निलेश लंकेंना संसदेत जाऊन इंग्रजी तरी बोलता येईल का अशी टीका देखील केली होती. त्याला आता निलेश लंके यांनी इंग्रजीत शपथ घेऊन प्रत्युत्तर दिल्याचे म्हटलं दात आहे.

 निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर त्यांचं कौतुक होऊ लागलं आहे. शरद पवार यांनी निलेश लंकेंनी सुजय विखेंना दिलेल्या प्रत्युत्तराचा आनंद असल्याचे  म्हटलं आहे. "मी सरळ सांगितलय कोणत्याही भाषेत बोलता येते. त्यामुळे एखादी जनमानसात काम करणारी व्यक्ती देशपातळीवरील संसदेत जात असेल तिच्या भाषेवरुन प्रश्न उपस्थित करणे हे काही शहाणपणाचे लक्षण नाही. त्याला उत्तर निलेश लंकेंनी दिले याचा आम्हाला आनंद आहे," असे शरद पवार यांनी म्हटलं.

"लोकांच्यासाठी काम करण्याची जिद्द मनात असेल तर कोणतीही भाषा त्याला अडचण ठरु शकत नाही. आज शपथ इंग्रजीत घेऊन हिनवणाऱ्यांना तुम्ही उत्तर दिलेच पण पुढील ५ वर्षात खासदार म्हणून नगर दक्षिणच्या लोकांना न्याय द्याल हा विश्वास आहे," असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाSharad Pawarशरद पवारnilesh lankeनिलेश लंकेSujay Vikheसुजय विखेBJPभाजपा