शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

शरद पवार धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला, नागपूरहून गडचिरोलीला जातानाची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 04:48 IST

नागपूरहून गडचिरोलीला जात असताना उमरेडसमोर कारला अपघात झाल्याचे दिसताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्वरित अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले.

नागपूर : नागपूरहून गडचिरोलीला जात असताना उमरेडसमोर कारला अपघात झाल्याचे दिसताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्वरित अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. चेंदामेंदा झालेल्या कारचे दरवाजे सुरक्षारक्षकांच्या मदतीने त्यांनी तोडले व जखमींना रुग्णालयात रवाना केले. पवार तब्बल २० मिनिटे अपघातस्थळी थांबून होते.पवार यांना ताफा सकाळी १०च्या सुमारास नागपूर विमानतळावरून निघाला. ११.०५ वाजता उमरेडच्या पुढे भिवापूरजवळ नागपूरकडे येणारी कार अपघातग्रस्त झाल्याचे त्यांना दिसले. गाडीला अर्ध्या मिनिटापूर्वीच अपघात झाला होता. रस्त्यावरून जात असलेल्या एका टिप्परला या कारने मागून धडक दिली होती व कारला मागून भरधाव येणाºया दुसºया टप्परने चिरडले होते. यात कारचा दोन्ही बाजूने चेंदामेंदा झाला होता. अपघातग्रस्त कारमध्ये गडचिरोली येथील अमित रामविलास यादव यांच्यासह त्यांचे वडील, पत्नी, आई जखमी अवस्थेत अडकले होते.अपघात पाहून पवार यांनी ताफा थांबविला. त्यांच्यासोबत माजी मंत्री अनिल देशमुख होते. पवार गाडीतून उतरले व थेट अपघातग्रस्त कारजवळ गेले. अपघातग्रस्त कार लॉक झाली होती. पवार यांनी सुरक्षारक्षकांच्या मदतीने कारचे दार तोडले व जखमींना बाहेर काढले. त्यांची विचारपूस केली. घटनास्थळी अ‍ॅम्ब्युलन्स येऊन जखमींना घेऊन जाईपर्यंत ते २० मिनिटे थांबून होते. यानंतर पवार गडचिरोलीसाठी रवाना झाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAccidentअपघातnagpurनागपूर