शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 22:09 IST

'लोकांवर अशा आरोपांचा परिणाम होत नाही, त्यामुळे आम्हाला चिंता नाही.'

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार(Sharad Pawar) यांनी 'लोकमत' व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांना विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सध्याच्या राज्यातील परिस्थितीवरुन विविध विषयांवर भाष्य केले. मी या काळात अनेक लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, यामुळे सत्ताधारी असहाय्य झाले आहेत आणि सातत्याने वैयक्तिक हल्ले करत आहेत, पण लोकांवर अशा आरोपांचा परिणाम होत नाही, त्यामुळे चिंता नाही, असं पवार म्हणाले.

EVM बाबत लोकांच्या मनात शंकायावेळी पवारांनी EVM चा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले, मी अनेक लोकांना भेटतो, त्यांच्या प्रतिक्रिया ऐकतो. अनेकजण मला म्हणतात की, आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहोत, पण तेवढं ते EVM मशीनचं बघा. या मशीनबाबत लोकांच्या मनात आजही शंका आहे. 

यंदा बारामतीवर पवारांचे विशेष लक्ष?कधी नव्हे ते पवारांना बारामतीवर लक्ष घालावे लागत आहे. मुलीसाठी पायाला भिंगरी लावून फिरत आहेत, अशी टीका सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. त्यावर पवार म्हणाले, मी आतापर्यंत बारामतीला एकच सभा घेतली आणि ती म्हणजे प्रचारसभेचे नारळ फोडण्याची सभा. मी अजून सभा घेईल, पण जिथे फार जात नाही, तेथील लोकांचाही आम्हाला पाठिंबा मिळत आहे. अनेक वर्षांपासून ज्या लोकांशी संवाद सुरू आहे, तो आजही आहे. त्यामुळे लोकांची साथ आम्हाला मिळेल, यात दुमत नाही.

विधानसभा क्षेत्रांचे गणित कसे जुळवणार?बारामती लोकसभा मतदारसंघात चार महायुतीचे आणि दोन काँग्रेसचे उमेदवार आहेत. यावर बोलताना पवार म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत संसदेत कोण भूमिका मांडणार, याचा लोक विचार करतात. लोकसभेच्या निवडणुकीत लोकांची मानसिकता वेगळी असते. सुप्रिया सुळे खासदार म्हणून प्रभावी आहेत. त्यांना तीनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे काम देश पातळीवर नावाजलेले आहे.

ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे  का?यावेळी पवारांना विचारण्यात आले की, तुम्ही सहावेळा बारामतीतून निवडून आला आहात. पण, आता यंदाची निवडणूक पवार विरुद्ध पवार की, मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे. यावर शरद पवार म्हणतात, या निवडणुकीचा राहुल गांधींशी काही संबंध नाही. ही गोष्ट खरी आहे की, नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी या निवडणुकीत विशेष लक्ष दिले आहे. अजित पवार आणि त्यांचे सहकारीदेखील कामाला लागले आहेत, तो त्यांचा अधिकार आहे. भाजपचे काही नेते मला सांगतात की, त्यांना वरुन आदेश देण्यात आले आहे की, या निवडणुकीवर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.  

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार