Sharad Pawar Pandharpur In Mandir: विठ्ठलाचरणी शरद पवार नतमस्तक! मनोभावे घेतले दर्शन; पांडुरंगाला घातले ‘हे’ साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 08:21 PM2023-05-07T20:21:59+5:302023-05-07T20:23:15+5:30

Sharad Pawar Pandharpur In Mandir: शरद पवारांनी ट्विटरवर यासंदर्भात माहिती देताना एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Sharad Pawar Pandharpur In Mandir: Sharad Pawar bowed down to Vitthalachari! Moods took darshan; Panduranga wears 'he' bags | Sharad Pawar Pandharpur In Mandir: विठ्ठलाचरणी शरद पवार नतमस्तक! मनोभावे घेतले दर्शन; पांडुरंगाला घातले ‘हे’ साकडे

Sharad Pawar Pandharpur In Mandir: विठ्ठलाचरणी शरद पवार नतमस्तक! मनोभावे घेतले दर्शन; पांडुरंगाला घातले ‘हे’ साकडे

googlenewsNext

Sharad Pawar Pandharpur In Mandir: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असल्याचे पाहायला मिळत आहे. लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनावेळी शरद पवार यांनी एकाएकी निवृत्ती जाहीर केली आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांनी केलेल्या प्रचंड आग्रहानंतर अखेरीस शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. 

निवृत्तीचा निर्णय मागे घेताच शरद पवार पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाले. पंढरपूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी मंदिरात जाऊन विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. शरद पवार यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. पंढरपूर दौर्‍यावर असताना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट देऊन विठ्ठल-रखुमाईचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी राज्यातील बळीराजाच्या सुख संपन्नतेसाठी विठ्ठल चरणी साकडे घातले, असे शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

विठ्ठलाच्या दर्शनाने मानसिक समाधान मिळते

विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतल्यानंतर शरद पवार म्हणाले की, देशात फार ठिकाणी मंदिरात जात नसतो. पण, काही मंदिर ही माझ्या अंत:करणात आहेत. त्यामध्ये पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर सुद्धा आहे. विठ्ठलाच्या दर्शनाने मानसिक समाधान मिळते. विठ्ठल देशातील कष्टकरी सर्वसामान्यांचे दैवत आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून उन्हातान्हाचा विचार न करता, दर्शनासाठी याठिकाणी लोक येतात. त्यामुळे सामान्य माणसाला समाधान देणारे हे मंदिर आहे. मंदिरात मी येत असतो, पण त्याचा प्रचार करत नाही, असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अभिजीत पाटील हे पंढरपूर-मंगळवेढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात, असा कयास बांधला जात आहे. 

 

Web Title: Sharad Pawar Pandharpur In Mandir: Sharad Pawar bowed down to Vitthalachari! Moods took darshan; Panduranga wears 'he' bags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.