Sharad Pawar on Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज(दि.28) सकाळी बारामती येथे झालेल्या विमानअपघातात निधन झाले. सकाळी सुमारे पावणेनऊच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या अपघातावरशरद पवारांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!
निव्वळ अपघात, राजकारण नको...
अजित पवार यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान नेता हरपला. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही. पण, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. ही घटना निव्वळ अपघात आहे. यात कोणतेही राजकारण करू नये," अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली.
विमान कसं आणि कुठं कोसळलं?
दरम्यान, अपघात घडला तेव्हा शरद पवार दिल्लीत होते. माहिती मिळताच ते दुपारी तातडीने बारामती येथे दाखल झाले. हेलिकॉप्टरमधून विमानतळावर उतरताच त्यांनी सर्वप्रथम उपस्थित अधिकाऱ्यांकडे आणि कर्मचाऱ्यांकडे “विमान कसं आणि कुठं कोसळलं?” असा प्रश्न विचारला. विमानतळाच्या धावपट्टीचा शेवट जिथे होतो त्या भागापासून सुमारे एक किलोमीटरच्या परिसरात हा अपघात झाला. धावपट्टीलगतच्या खोलगट भागात विमान कोसळल्याची माहिती शरद पवारांना देण्यात आली.
चढ-उतारांनी भरलेले अजितदादांचे आयुष्य; मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न राहिले अपुरे...
Web Summary : Following Ajit Pawar's tragic plane crash death in Baramati, Sharad Pawar called it an accident, urging no political exploitation. Pawar, deeply saddened by the loss of a capable leader, visited the crash site, questioning officials about the accident's details near the runway.
Web Summary : बारामती में अजित पवार की दुखद विमान दुर्घटना में मृत्यु के बाद, शरद पवार ने इसे दुर्घटना बताया, राजनीतिक शोषण से बचने का आग्रह किया। एक सक्षम नेता के नुकसान से दुखी पवार ने दुर्घटनास्थल का दौरा किया और रनवे के पास दुर्घटना के बारे में अधिकारियों से पूछताछ की।