शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

'मी काँग्रेस सोडली, पण गांधी-नेहरूंचे विचार कधीही सोडले नाहीत': शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 13:08 IST

'मी 1958 साली पुण्यात आलो होतो. मी आणि माझ्यासारखे तरुण गांधी, नेहरू, चव्हाण यांच्या विचारांनी प्रेरित झाले.

पुणे:काँग्रेसशी फारकत घेऊन स्वत:चा पक्ष काढल्यानंतरही महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि यशवंतराव चव्हाण यांचे विचार कधीच सोडले नाहीत, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्यासाठी 1999 पर्यंत वाट पाहिली, याची खंत नाही, असे ते म्हणाले. शरद पवार बुधवारी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

...म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढलाशरद पवार पुढे म्हणाले, मी 1958 साली पुण्यात आलो होतो. माझ्यासारख्या तरुणांना गांधी, नेहरू, चव्हाण यांच्या विचारसरणीची प्रेरणा मिळाली. त्यांचे विचार आम्ही स्वीकारले आणि त्यावर काम सुरू केले. काँग्रेस हा त्या विचारधारेचा मुख्य आधार होता, त्यामुळे त्यापासून दूर जाण्याचा विचार कधीच केला नाही. काँग्रेसने मला पक्षातून बाहेर केले, त्यामुळे मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्याचा वेगळा निर्णय घ्यावा लागला, असेही पवार म्हणाले. 

काँग्रेसला पवारांची गरज ?ते पुढे म्हणाले की, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काही मत व्यक्त केल्याचे त्यांना पचनी पडले नाही, काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, पण गांधी, नेहरू, चव्हाण यांचे विचार आम्ही कधीच सोडले नाहीत. काँग्रेसला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पवारांची मदत लागेल का? असा प्रश्न विचारला असता, पवार म्हणाले की, आज सर्व समविचारी लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस