शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

"तानाजी सावंत मुख्यमंत्र्यांच्या मनातलंच बोलले"; महायुतीतील 'शीतयुद्धा'वर शरद पवार गटाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 10:51 IST

Tanaji Sawant Ajit Pawar: शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्या विधानावरून महायुतीत वादाची ठिणगी

Tanaji Sawant Ajit Pawar, Mahayuti: राज्यात दोन महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेसाठी महायुती एकत्रित लढणार असल्याची चर्चा आहे. पण काही नेतेमंडळींच्या बेताल वक्तव्यांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडू शकतो. नुकतेच शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या विधानाने महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. "अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आपले आयुष्यभर पटले नाही. आता आपण मांडीला मांडी लावून बसलो आहोत परंतु बाहेर आल्यावर उलट्या होतात," असे तानाजी सावंत म्हणाले. या विधानाला अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गटातून प्रतिक्रिया आल्या आहेतच. पण महायुतीतील या शीतयुद्धावर शरद पवार गटानेही (Sharad Pawar NCP) टोला लगावला आहे.

वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते भडकल्याचे दिसत आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी यावरुन शिंदे गटाला टोला लगावला. मिटकरी म्हणाले, 'महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांना जर उलट्या होत असतील तर त्या कशामुळे होतात हे एकनाथ शिंदेच सांगू शकतील असे म्हटले आहे'.

शरद पवार गट काय म्हणाला?

लोकसभा निवडणुकीतही भाजपाची पीछेहाट झाल्यावर याला जबाबदार अजित पवार असल्याचा सूर संघ आणि भाजपाने आळवला. त्यातच शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची अजितदादा विषयी भूमिका व त्यांना सरकारमध्ये सामील केल्याबाबतची नाराजी ही आता उघड उघड समोर येऊ लागलेली आहे. कॅबिनेटला अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसावं लागतं व बाहेर आल्यानंतर उलट्या होतात असं वक्तव्य शिंदे सरकारचे मंत्री तानाजी सावंत यांचं आहे. अजितदादांसारखा एक नेता अशा प्रकारचा अपमान कसं काय सहन करू शकतो हेच कळत नाही. सत्तेसाठी एवढी लालसा अजित दादांच्या मनात असावी हे कधी वाटलं नव्हतं. त्यांच्यातला स्वाभिमानी बाणा कुठे हरपला याचा शोध अजित दादांच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला.

"शरद पवारांच्या पक्षापासून फारकत घेत अजित पवार यांनी विकासाच्या साठी सत्तेमध्ये जात आहोत अशी घोषणा केली होती. त्याला दुजोरा प्रफुल पटेल, छगन भुजबळ,सुनील तटकरे व आदी नेत्यांनी दिला होता. आता अजित दादांच्या अस्तित्वावरच घाला मंत्री तानाजी सावंत यांनी घातल्यानंतर अजित पवारांच्या पक्षातील हे सर्व नेते गप्प का? विधानसभेत महायुतीकडून ८० ते ९० जागा मिळवू अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केली होती. आता २५ जागा मिळतील की नाही याचीही शाश्वती अजित दादांच्या राष्ट्रवादीला राहिली नाही आणि म्हणूनच त्यांना अशा प्रकारचा अपमान सहन करावा लागतो," असा टोमणा तपासे यांनी मारला.

"शरदचंद्र पवारांच्या पक्षांमध्ये अजितदादा असताना त्यांच्या बाजूला बसण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठी चढाओढ असायची. त्याच अजितदादांच्या बाजूला बसून शिंदे सरकारच्या मंत्र्यांना उलट्या होतात हे अगदी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनातलं तानाजी सावंत बोलून गेले की काय?" असा सवाल तपासे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंतAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना