मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत होते. अखेर आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट करत शरद पवार यांनी आपल्या निवडणूक लढवण्यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक सध्या मुंबईत सुरू आहे. दरम्यान, या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली. आपण पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
लोकसभा निवडणूक लढवणार नाही, शरद पवार यांनी केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 13:14 IST