शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

"शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेलाय, सरकारने..."; जयंत पाटलांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 12:36 IST

नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी, पिडीताच्या नातेवाईकांची घेतली भेट

Jayant Patil slams Govt: अवकाळी पावसामुळे लाखो रुपयांचे पीक वाया गेले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे गेला आहे. सरकारने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे. विशेष पॅकेजची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) शेतकरी आक्रोश मोर्चा आज नाशिकमध्ये आहे. जयंत पाटील यांनी आज जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील रामाचे पिंपळस या गावात जावून नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली. तसेच शेतकरी सुभाष विठोबा मत्सागर यांचा शेतात काम करत असताना अवकाळी पावसाच्या गारपीटीने मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांचीही सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी ही मागणी केली.

जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही की अनुदान आलेले नाही. अनुदानाची अनेकदा घोषणा केली मात्र ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात अजून वर्ग झालेले नाहीत. सरकारने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहायला पाहिजे असे आवाहन त्यांनी सरकारला केले.

आज जिल्ह्यातील दिंडोरी येथे निघणाऱ्या आक्रोश मोर्चाबाबत सांगताना ते म्हणाले, "आज राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचा आणि अवकाळीचा मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना पाण्यासाठी कसरत करावी लागते. पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. अनेक भागात टँकरचा पुरवठा अद्याप सुरू झालेला नाही. या सगळ्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केलेले आहे. कापसाला दर अजून निश्चित नाही." या सगळ्या समस्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज दिंडोरी तालुक्यात शेतकरी आक्रोश मोर्चा काढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसGovernmentसरकार