शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

"शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार मग अजित पवार कोण?", बच्चू कडूंचा अमित शाह यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 16:34 IST

Bachu Kadu News: शरद पवार यांना भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हणण्यावरून आमदार बच्चू कडू यांनी अमित शाह यांना टोला लगावला आहे. शरद पवार हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असतील तर अजित पवार हे कोण आहेत, असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला आहे. 

पुण्यात झालेल्या भाजपाच्या महाअधिवेशनामध्ये उपस्थित नेते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती. शरद पवार हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावरून आज राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, शरद पवार यांना भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हणण्यावरून आमदार बच्चू कडू यांनी अमित शाह यांना टोला लगावला आहे. शरद पवार हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असतील तर अजित पवार हे कोण आहेत, असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला आहे. 

अमित शाह यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की, जर शरद पवार हे सरदार आहेत, तर मग अजित पवार कोण, असं लोकं विचारतील. सरदारांचे पुतणे आहेत की कोण आहेत, हे विचारलं जाईल. कदाचित अमित शाह हे विसरभोळे झाले असतील. ते बऱ्याचदा चुकीची विधानं करतात आणि मग ती अंगलट येतात, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला. 

ते पुढे म्हणाले की, राजकारणात सत्ता महत्त्वाची झालेली आहे. मागच्या पाच वर्षांत भाजपाने सत्ता महत्त्वाची, मग ती कशीही मिळो, कुणीही भेटो, असं धोरण राबवलेलं आहे, अशा विचारामधून ते सगळं झालेलं आहे. शरद पवार हे काही कच्चे खेळाडू नाहीत. त्यामुळे ते भाजपामध्ये जातील, असं वाटत नाही, असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले. दरम्यान, भाजपाने मुख्यमंत्रिपदासाठी केलेल्या मोर्चेबांधणीबाबत बच्चू कडू म्हणाले की,  आम्ही जर तरवर विश्वास ठेवत नाही. दूध का दूध, पानी का पानी हे मतदार ऑक्टोबर महिन्यात दाखवून देतील. दिवाळीचा खरा गोड पदार्थ कुणाच्या तोंडी लागेल, हे आज सांगण्यात काही अर्थ नाही असेही बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूAmit Shahअमित शाहSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुती