पुणे: शरद पवार यांना खोकल्याच्या त्रासामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी रुग्णालय प्रशासनाशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी केवळ एक कौटुंबिक सदस्य म्हणून नाही, तर एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून डॉक्टरांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
"डॉक्टर, तुम्ही जसं म्हणाल तसंच आम्ही सगळे वागू. तुमचं सजेशन आमच्यासाठी अंतिम राहील," असे म्हणत सुप्रिया सुळेंनी उपचारांची पूर्ण सूत्रे डॉक्टरांच्या हाती सोपवली आहेत. माध्यमांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली चिंता दूर करण्यासाठी त्यांनी विनंती केली की, "पुढील १० मिनिटांत डॉक्टर स्वतः माध्यमांना शरद पवार यांच्या प्रकृतीची अधिकृत माहिती देतील." तसेच कोणत्याही व्हिजिटर्सला आत सोडू नका. हॉस्पिटलचे सगळे नियम काटेकोरपणे पाळा, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला दिली.
रुग्णालय परिसरात सध्याची स्थितीरुबी हॉल क्लिनिकच्या बाहेर सध्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनंतर पोलिसांनी बंदोबस्त अधिक कडक केला असून, कोणालाही अनावश्यकरीत्या आत प्रवेश दिला जात नाही. थोड्याच वेळात डॉक्टरांचे वैद्यकीय बुलेटिन प्रसिद्ध केले जाणार आहे. शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांच्या काही टेस्ट केल्या जाणार आहेत, असे रुग्णालयातील सुत्रांनी सांगितले आहे.
Web Summary : Supriya Sule assured doctors of full cooperation regarding Sharad Pawar's health. She emphasized strict adherence to hospital rules, limited access, and timely medical updates to address public concerns. Pawar's condition is stable.
Web Summary : सुप्रिया सुले ने शरद पवार के स्वास्थ्य के बारे में डॉक्टरों को पूर्ण सहयोग का आश्वासन दिया। उन्होंने अस्पताल के नियमों का सख्ती से पालन करने, सीमित पहुंच और सार्वजनिक चिंताओं को दूर करने के लिए समय पर चिकित्सा अपडेट पर जोर दिया। पवार की हालत स्थिर है।