शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शरद पवारांच्या अनुभवाचा फायदा घ्यायचाच होता, तर पाच वर्षं का थांबले?- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 15:40 IST

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत.

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी संजय राऊतांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. आपल्या भाषणांनी संजय राऊतांनी भाजपालाही जेरीस आणलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं संजय राऊतांची मुलाखत घेतली आहे.यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. भाजपाला जेव्हा शरद पवार स्वतःहून ऑफर देतात, तेव्हा ती महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठी भाजपा किती उतावळी होती हेच यातून दिसून येतं. महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत अगदी प्रधान मंत्र्यांपर्यंत यातून स्पष्ट झालेलं आहे. तुम्ही एका बाजूला सांगत होता, आमच्याकडे बहुमत नाही. आम्ही सरकार बनवणार नाही. तुम्ही राष्ट्रपती राजवट लावली, मग तुम्ही अजित पवारांना फोडण्याचा प्रयत्न केलात. आणि तेही जमलं नाही, तेव्हा तुम्ही शरद पवारांवर अशा प्रकारचं जाळं फेकत होतात, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 

पुढे ते म्हणतात, तेसुद्धा यशस्वी झालं नाही. यातून एक स्पष्ट आहे, महाराष्ट्रातली सत्ता आम्ही शिवसेनेच्या हाती लागू द्यायची नाही, असाच त्यांचा उद्देश होता. अडीच अडीच वर्षं 50-50 नंतर पलटी मारली. शरद पवारसुद्धा चालतील, इतर कोणीसुद्धा चालतील. शिवसेना नको, हा एक संदेश यातून स्पष्ट झाला. शरद पवारांनी हा डाव उधळून लावला. ते काही त्यांच्या झाशामध्ये आले नाहीत. पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा जर घ्यायचाच होता. तर पाच वर्षं का थांबले. याआधीसुद्धा शरद पवार विरोधी पक्षात होते, अनुभव त्यांचा तोच आहे. व्यक्ती तीच आहे. पण आता सरकार स्थापनेसाठी गरज लागते आहे म्हणून त्यांच्या अनुभवाचा केंद्रात आणि महाराष्ट्रात त्यांना फायदा घ्यायचा होता, हे जनतेला कळत नाही काय?, त्यावरती फार बोलणं आवश्यक नाही. सरकारच्या स्थिरतेबद्दल अजिबात शंका वाटत नाही. शरद पवार यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्रातील जनता अशा प्रकारचं वागणं सहन करणार नाही. जनतेच्या भावना किती तीव्र आहेत हे आपण शिवतीर्थावरच्या शपथविधीदरम्यान पाहिल्या आहेत. ग्रामीण भागात जाऊन पाहा. 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानं जनतेला खूप आनंद झालेला आहे. विरोधासाठी विरोध हे शिवसेनेचं धोरण कधीही नव्हतं. एखादी गोष्ट राष्ट्रीय हिताची असल्यास शिवसेनेनं अनेकदा विरोधाची भूमिका सोडलेली आहे. सरकारमध्ये असतानाही ज्या भूमिका पटलेल्या नाहीत, त्यांना आम्ही विरोध केलेला आहे. राष्ट्र आणि राष्ट्राची जनता ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे. प्रत्येक राज्याची यासंदर्भातली भूमिका वेगळी आहे. आसाममध्ये भाजपाचं सरकार आहे, पण त्यांची या प्रकरणातली भूमिका वेगळी आहे. निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचे असतात. मला वाटत नाही अशा प्रकारची मागणी कोणी फार गांभीर्यानं केली असेल. संघटनांवर बंदी घालून प्रश्न सुटत नाहीत आणि विचार मरत नाहीत. कोरेगाव-भीमाप्रकरणी जो काही निर्णय असेल तो मुख्यमंत्री घेतील. सनातनवरील बंदीनं प्रश्न सुटणार नाहीत. विचार मरणार नाहीत.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019