शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार गट लवकरच सत्तेत सहभागी होईल; शिवसेना मंत्र्यांच्या दाव्याने राजकीय खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 18:25 IST

दिल्लीत संसदेच्या अधिवेशनावेळी अजित पवारांसह सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राष्ट्रवादीचे २ गट पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली. 

मुंबई - मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना जोर आला आहे. त्यात प्रामुख्याने शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्रित येतील अशी चर्चा आहे. शरद पवारांनी या चर्चेला ठामपणे नकार दिला असला तरी दिल्लीतील गाठीभेटी आणि खासदारांच्या फोडाफोडीच्या बातम्या थांबल्या नाहीत. त्यातच शिवसेना मंत्र्‍याने केलेल्या दाव्याने राजकीय खळबळ माजली आहे. लवकरच शरद पवार गट सत्तेत सहभागी होईल असा दावा शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

संजय शिरसाट म्हणाले की, महाविकास आघाडीत मुद्दाम मिठाचा खडा टाकणारे पहिले संजय राऊत होते. महाविकास आघाडी आता राहणार नाही. त्यांना काँग्रेससोबत जाण्याची गरज वाटत नाही. शरद पवारांची भूमिका दिवसेंदिवस बदलताना आपण पाहतोय. याचा अर्थ असा होतो की आता आपल्याला सत्तेत जायचं आहे. सत्तेशिवाय जे राहू शकत नाही त्यांचे मन परिवर्तन होऊन ते युतीच्या किंवा अजित पवारांसोबत जाण्याचा प्रयत्न राहील. येत्या महिनाभरात हाच प्रयत्न तुम्हाला दिसून येईल असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच राष्ट्रवादीला भूमिका बदलायची सवय आहे. हीच राष्ट्रवादी कधीकाळी काँग्रेसमधून बाहेर पडली. त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये गेली. ज्यांच्या कधी आयुष्यात जमलं नाही त्या उबाठासोबत त्यांनी युती केली. पहाटेचा शपथविधीही यांनीच केला. भविष्यात यांचा वेध सत्तेच्या दिशेने आहे जे सगळ्यांना जाणवतंय. येत्या महिनाभरात राष्ट्रवादीचा वेगळा अजेंडा तुम्हाला पाहायला मिळेल असंही मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, उबाठा गट काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडत नाही तर ते यांना सोडतायेत म्हणून आता तडफड चालू आहे. त्यांना जाणीव होऊ द्या, ते हात पुढे करत नाहीत मग टाळी द्यायची की नाही आम्ही ठरवू. ३-३ वेळा देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटणे, यांच्या बदलत्या भूमिका महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत त्यामुळे यांच्या भूमिकेवर कुणीही विश्वास ठेवत नाही. आम्ही ४० चे ६० आमदार झालो उद्धव ठाकरेंचे ५६ चे २० आमदार झालेत. भविष्याची बाता करणाऱ्यांनी स्वत:चं भविष्य पाहावे असा टोला मंत्री संजय शिरसाट यांनी लगावला. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाSanjay Shirsatसंजय शिरसाटSharad Pawarशरद पवारBJPभाजपाAjit Pawarअजित पवार