शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

'हा जावई शोध तुम्ही कुठून लावला?', शरद पवारांचा पत्रकार परिषदेत चढला पारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 14:01 IST

Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील खासदार भाजपसोबत जाण्याची चर्चा मागील काही दिवसांपूर्वी झाली. याबद्दल जेव्हा शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांचा अचानक पारा चढला. 

Sharad Pawar on BJP: पत्रकार परिषद सुरू असताना एका पत्रकाराने शरद पवारांना प्रश्न विचारला भाजपसोबत जाण्याबद्दल. खासदार भाजपसोबत जायचं म्हणत असल्याबद्दल बातम्या आल्यात. तुमचं व्यक्तिगत मत काय? अशा आशयाचा प्रश्न ऐकताच पवार भडकले. शरद पवारांनी उत्तर दिलं आणि काही तरी तारतम्य बाळगलं पाहिजे, अशी तंबीही दिली.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात एक चर्चा जोरात रंगली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या खासदारांच्या संपर्कात. त्या चर्चेवर नंतर पडदा पडला. पण, याच संदर्भात जेव्हा शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते चांगलेच भडकले. 

शरद पवारांना कोणता प्रश्न विचारण्यात आला?

अशा बातम्या समोर येताहेत की, तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक खासदार असं म्हणताहेत की, आपण भाजपसोबत जाऊ. असं काही आहे का? तुमचं व्यक्तिगत मत काय आहे? 

शरद पवारांनी काय उत्तर दिले?

या प्रश्नानंतर शरद पवारांचा पारा चढल्याचे दिसले. ते लगेच म्हणाले, "कसलं व्यक्तिगत मत? व्यक्तिगत मत काय द्यायचं? एकाही खासदाराचं असं मत नाहीये. हा जावई शोध तुम्ही कुठून लावला, हे मला माहिती नाही. आणि राज्याचा पक्षाचा प्रमुख त्याला तुम्ही विचारताहेत की, तुमचा पक्ष सोडून तुम्ही जाणार आहात का? त्याच्यावर तुम्ही माझं व्यक्तिगत मत विचारत आहात. काही तरी तारतम्य बाळगायला पाहिजे", अशा शब्दात पवारांनी संताप व्यक्त केला.  

इंडिया आघाडीतील संवाद खरंच संपलाय का? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. ते म्हणाले, "अजिबात नाही, संवाद आहे. म्हणूनच मी सांगितलं की शक्य झालं तर आठ-दहा दिवसांत आम्ही बैठक बोलवत आहोत. मी स्वतः बोलवणार आहे."

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी