शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमोल कोल्हेंनी साकारलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवर शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत, समर्थन करत दिला असा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 15:03 IST

Amol Kolhe News: प्रसिद्ध आभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी Why I Killed Gandhi या चित्रपटामध्ये Nathuram Godseची भूमिका साकारल्याचे समोर आल्यापासून राज्याच्या राजकारणात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख Sharad Pawar यांनी आपलं मत मांडलं आहे.

मुंबई - प्रसिद्ध आभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी Why I Killed Gandhi या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याचे समोर आल्यापासून राज्याच्या राजकारणात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्यातील पुरोगामी विचारवंत मंडळींकडून अमोल कोल्हेंवर टीका होत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील जितेंद्र आव्हाड यांच्यासह काही नेत्यांनी नथुरामची भूमिका साकारल्याने अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आपलं मत मांडलं असून, त्यांनी चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारणाऱ्या अमोल कोल्हे यांना पाठिंबा दिला आहे.

अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेबाबत मत मांडताना शरद पवार म्हणाले की, महात्मा गांधी यांच्यावर आधारित गांधी हा चित्रपट जगभरात गाजला होता. त्या चित्रपटामध्ये सुद्धा नथुराम गोडसे याचे पात्र होते. ती भूमिका साकारणाराही कलाकार होता. तसेच कलाकार म्हणून अमोल कोल्हेंच्या भूमिकेकडे पाहिले पाहिजे, असा सल्ला शरद पवार यांनी दिला. आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांनीच पाठिंबा दिल्याने कालपासून टीकेचे लक्ष्य झालेल्या अमोल कोल्हे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यावेळी अधिक स्पष्टपणे विचार मांडताना शरद पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटामध्ये एखादा कलाकार औरंगजेब बादशाहची भूमिका साकारतो. मात्र त्याचा अर्थ तो मुघलांचा समर्थक असतो, असा होत नाही. तसेच रामायणामध्ये रावणाची भूमिका करणाऱ्याने सीतेचं अपहरण केलं, असा त्याचा अर्थ होत नाही. तसेच अमोल कोल्हे यांनी जी भूमिका केली आहे ती एक कलावंत म्हणून केली आहे. त्याचा अर्थ ते गांधीविरोधी आहेत, असा होत नाही. तसंच या विषयी भाजपाकडून होणाऱ्या टीकेवरूनही त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे. भाजपा गांधीवादी कधीपासून झाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNathuram Godseनथुराम गोडसे