शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेंचं कौतुक, ठाकरेंचा संताप! शिंदेसेनेच्या नेत्यांनी संजय राऊतांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 13:05 IST

ज्या व्यक्तीनं ५६ वर्ष महाराष्ट्रासाठी योगदान दिले त्या शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक करून त्यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे यावर शिक्कामोर्तब केलं आहे असं सामंत म्हणाले.

मुंबई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांच्या हस्ते दिल्लीत सत्कार करण्यात आला. महादजी शिंदे नावाचा पुरस्कार देऊन एकनाथ शिंदेंना गौरवण्यात आले. परंतु याच सन्मान सोहळ्यावरून महाराष्ट्रातील राजकारण पेटलं आहे. संजय राऊतांनी सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेत थेट शरद पवारांना टार्गेट केले. महाराष्ट्राच्या शत्रूंना असे पुरस्कार देणे कुणालाही रूचले नाही असं सांगत ठाकरे गटाने शरद पवारांसह एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. मात्र राऊतांच्या टीकेवरून शिंदेसेनेच्या नेत्यांनी राऊतांना सुनावले आहे.

मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, संजय राऊत स्वत:ला विश्वज्ञानी प्रवक्ते समजात. विश्वातलं परिपूर्ण ज्ञान त्यांनाच आहे आणि त्याच्याविरूद्ध कुणी भूमिका घेतली तर त्यांना खपत नाही. शरद पवारांच्या भूमिकेपेक्षा विसंगत भूमिका तुमची असेल मग महाविकास आघाडीतून बाहेर पडा. संजय राऊतांना वैफल्य आलं आहे. उबाठाचं राजकीय स्थान दिवसेंदिवस खाली जात चाललंय, त्याला कारणीभूत संजय राऊत आहे. पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचे हे ठरवण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही. केंद्रीय निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट इथं आम्ही आमचे पुरावे दिले, कागदपत्रे दिले, प्रतिज्ञापत्र दिले. त्यानंतर निवडणूक आयोगाने आमची शिवसेना खरी असा निर्णय दिला. या निर्णयाला सुप्रीम कोर्टानेही स्थगिती दिली नाही. आमचे नाव तेच चिन्हही तेच आहे. पक्ष फोडायचा विषयच येत नाही. २०१९ ला ज्यांच्याविरोधात आपण निवडणूक लढलो त्यांच्यासोबत जात सत्तेत बसला, त्याचे उत्तर आधी द्यावे असा टोला त्यांनी लगावला. 

तर संजय राऊत स्वत:ला एवढे मोठे समजतात की शरद पवारांनी काय करावे आणि काय नाही हे सांगतात. ज्यांना गद्दार म्हणताय त्यांच्या मतांवर तुम्ही निवडून आलात मग राजीनामा द्यावा. शिवसेना-भाजपा म्हणून विधानसभा निवडणूक लढली आणि सत्तेसाठी तुम्ही कोणासोबत गेला, तेव्हा लोकांच्या मतांची गद्दारी केली. आपली योग्यता काय हे विधानसभा निवडणुकीत लोकांनी दाखवून दिले. मशिदीत जाऊन पाया पडत होते. बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी यांनी केली. रणांगणात एकनाथ शिंदे लढले, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली त्यांच्याशी लढले आणि बाळासाहेबांच्या विचारांशी पक्ष बांधून ठेवला. महाराष्ट्रातील जनतेने त्याचे फळ निवडणुकीच्या निकालात दिले आहे असं खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं.

दरम्यान, शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यांनी एकनाथ शिंदेंचा सन्मान केला. त्यांच्या भाषणात एकनाथ शिंदेंचं कौतुक केले. ज्या व्यक्तीनं ५६ वर्ष महाराष्ट्रासाठी योगदान दिले त्या शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक करून त्यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे यावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे काही लोकांना पोटशूळ उठला आहे. एकनाथ शिंदे यांचं कौतुक करणारा माणूस त्यांच्यासाठी वाईट असतो म्हणून ते शरद पवारांवर बोलतायेत. साहित्य संमेलनाला दलाली म्हणत असतील तर हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान आहे असं घणाघात मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊतांवर केला.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेSharad Pawarशरद पवारUday Samantउदय सामंतShambhuraj Desaiशंभूराज देसाईnaresh mhaskeनरेश म्हस्के