...तर झाड तोडणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना बाळासाहेबांनी फटके मारले असते: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 03:29 PM2019-12-20T15:29:46+5:302019-12-20T15:30:29+5:30

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे व महापौर नंदुकुमार घोडले हे सुद्धा उपस्थित होते.

sharad pawar comment on shivsena leaders at aurangabad | ...तर झाड तोडणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना बाळासाहेबांनी फटके मारले असते: शरद पवार

...तर झाड तोडणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना बाळासाहेबांनी फटके मारले असते: शरद पवार

Next

मुंबई: औरंगाबाद येथील होऊ घातलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा मुद्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी शिवसेना नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. ठाकरेंच्या स्मारकासाठी झाडे तोडण्यात आली, मात्र बाळासाहेब जिवंत असते आणि त्यांच्यासाठी झाडे तोडली असती तर झाड तोडणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना त्यांनी फटके मारले असते, असे शरद पवार म्हणाले.

महात्मा गांधी मिशन या संस्थेचे सचिव व एमजीएम विद्यापिठाचे कुलपती अंकुशराव उर्फ बाबुराव कदम यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार समारंभात शरद पवार बोलत होते. यावेळी बोलताना पवार यांनी आपल्या भाषणात औरंगाबाद येथील होऊ घातलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा उल्लेख केला. या स्मारकासाठी महापालिकेच्या वतीने प्रियदर्शिनी गार्डनमधील जवळपास 500 झाडे तोडण्यात आली. महापाकिकेत सध्या शिवसेनेचा महापौर आहे.

मात्र ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उद्यान होणार आहे, ते बाळासाहेब जिवंत असते आणि त्यांच्यासाठी झाडे तोडली असती तर झाड तोडणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना फटके मारले असते, असे शरद पवार म्हणाले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे व महापौर नंदुकुमार घोडले हे सुद्धा उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील होते. माजी मंत्री व एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती दिली. तसेच या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्याच्या निमित्ताने कदम यांच्या जीवनावर आधारीत 'शिल्पकार' या गौरवग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या करण्यात आले.

Web Title: sharad pawar comment on shivsena leaders at aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.