शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शरद पवारांचा नातवावर दृढ विश्वास! रोहित पवारांना दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 19:00 IST

शरद पवार यांच्या सूचनेनुसार प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्यावर नवीन जबाबदारी सोपवल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची पुढील पिढी अजित पवार (Ajit Pawar) आणि यानंतर रोहित पवार (Rohit Pawar) अशी तिसरी पिढी राजकारण सक्रीय आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेससाठीरोहित पवार यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. यानंतर आता रोहित पवार यांच्यावर आजोबा शरद पवार यांनी नवीन जबाबदारी सोपवली आहे. 

रोहित पवार तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. रोहित पवार यांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये रोहित पवार यांनी एकतर्फी विजय मिळवला होता. त्यामुळेच रोहित पवार यांच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. नगरपंचायत निवडणुकीतील जबाबदारी यशस्वीरितीने पार पडल्यामुळे रोहित पवारांवरील विश्वास वाढल्याची चर्चा आहे. यातच रोहित पवार यांनी एक ट्विट करत यासंर्भातील माहिती दिली आहे. 

सर्व निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल

आदरणीय शरद पवार यांच्या सूचनेनुसार प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर सोपवलीय. पक्षादेशानुसार, आगामी काळात या मतदारसंघात संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवे-जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने कामाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला जाईल आणि या विश्वासाच्या बळावरच आगामी सर्व निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वास आहे, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. 

दरम्यान, पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील १५ ते १७ महानगरपालिकाच्या निवडणूका पार पडणार आहेत. त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणूका आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप वेळ असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारी सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठीच भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी रोहित पवार यांच्याकडे दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस