शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

काकांचा निवडून आणण्यात तर पुतण्याचा पाडण्यात हातखंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 16:39 IST

पवारांनी सातारा लोकसभा पोट निवडणुकीत आपले मित्र श्रीनिवास पाटील यांना बलाढ्य उदयनराजे यांच्याविरुद्ध निवडून आणण्याची किमया केली. त्यामुळे पवार काका-पुतण्याची निवडून आणण्याची आणि पाडण्याची कला पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे.

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांनी दिलेला शब्द अनेक ठिकाणी प्रमाण मानला जातो. त्यामुळे त्यांना 'एकच वादा अजित दादा' असं त्यांचे समर्थक संबोधतात. तेच पुन्हा एकदा सिद्ध होताना दिसत आहे. एका सभेत अजित पवार यांनी पाठबंधारे मंत्री  विजय शिवतारे कसे निवडून येतो तेच बघतो, असं म्हटलं होतं. अगदी तसच होताना दिसत आहे. शिवसेना उमेदवार शिवतारे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार कोणालाही निवडून आणू शकतात, तर अजित पवार कोणत्याही उमेदवाराला पाडण्याचे क्षमता ठेवतात, असं मिथक महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. या काका-पुतण्याच्या राजकारणाचा फंडाच काही वेगळा आहे. आपल्या सडेतोड बोलण्यामुळे अजित पवार अनेकदा वादात अडकतात. परंतु, त्यांनी आपली लकब कधीही बदलली नाही.

काय पोपटासारखा मिटू मिटू बोलायला लागलाय, अरे विजय शिवतारे तुझं बोलणं किती..?तुझा आवाज किती..? तू बोलतोय कुणा बरोबर, तुला यंदा दाखवतोच तू कसा आमदार होतो ते...अख्या महाराष्ट्राला माहितीय मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही.. आम्ही म्हणतो बाबा , जाऊ द्या जाऊ द्या, गप बसा, गप बसा, याच तर नुसतं उर भरून आलंय .. त्याला काय करू काय नाय ..तू आता २०१९ ला  कसा आमदार होतोय तेच बघणार आहे, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्यापासूनच शिवतारे यांचं काय होणार असा प्रश्न मतदार संघात उपस्थित करण्यात येत होता. आता निकाल समोर आला असून शिवतारे पराभूत झाले. काँग्रेसचे संजय जगताप यांना शिवतारे यांचा पराभव केला. दुसरीकडे पवारांनी सातारा लोकसभा पोट निवडणुकीत आपले मित्र श्रीनिवास पाटील यांना बलाढ्य उदयनराजे यांच्याविरुद्ध निवडून आणण्याची किमया केली. त्यामुळे पवार काका-पुतण्याची निवडून आणण्याची आणि पाडण्याची कला पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे.