शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जायचं, पण कोणत्या तोंडाने..? शरद पवार-अजित पवार वादात कार्यकर्त्यांची गोची

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 09:34 IST

ज्यांनी आंदोलन छेडले त्यातील काहीजण आता अजित पवार यांच्या गटात सामील होण्याचा विचार करीत आहेत.

शिवसेनेच्या फुटीनंतर जे चित्र होते तेच आज राष्ट्रवादीच्या फुटीनंतर वेगवेगळ्या शहरांत अनुभवायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार गट उदयास आले असताना कल्याण-डोंबिवलीतही काही प्रमाणात का होईना शरद पवार किंवा अजित पवार गट दिसायला सुरुवात झाली आहे. कल्याणमधील राष्ट्रवादीचा एक मोठा गट अजित पवार यांच्या गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे; पण अजित पवार यांनी पहाटेची शपथ घेतली होती त्यावेळी राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात आंदोलन छेडले होते. त्या आंदोलनावर टीका झाली. ज्यांनी आंदोलन छेडले त्यातील काहीजण आता अजित पवार यांच्या गटात सामील होण्याचा विचार करीत आहेत. त्यांच्याविरोधात आंदोलन छेडणारे कोणत्या तोंडाने आता अजित पवारांसोबत जातील, अशी कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये आहे.

श्रीनिवास यांची पुन्हा शिष्टाईराष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीच्या निमित्ताने पवार कुटुंबातही फूट पडल्याचे चित्र उभे राहिल्याने आता कुटुंबातूनच ही दूरी सांधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मागीलवेळी जेव्हा अजित पवार यांनी बंड करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, तेव्हा ते आपले भाऊ श्रीनिवास यांच्याकडे मुक्कामाला होते. त्याच श्रीनिवास यांनी शरद पवार यांची भेट घेत चर्चा गेल्याने कुटुंबातील कलह मिटवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता ही श्रीनिवास शिष्टाई किती यशस्वी होते, ते अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच्या प्रतिसादानंतरच कळेल.

काँग्रेसचे धोरण पवारपूरकराष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याने राज्यात काँग्रेसच्या वाढीला आता पूरक वातावरण आहे. काँग्रेस वाढवायची, पण पवारांना न दुखावता... असा फॉर्म्युला काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस राहुल गांधी यांच्यासह राज्यातील नेत्यांच्या दिल्लीच्या बैठकीत ठरल्याचे सांगितले जाते. भाजपसोबत न जाता पवारांनी एकप्रकारे आपली काँग्रेस विचारांशी बांधिलकी दाखवून दिल्याचे मानणारा मोठा गट काँग्रेसमध्ये आहे. शिवाय पवारांची ज्या पद्धतीने कोंडी झाली त्याबद्दल जशी भाषा वापरण्यात आली आणि भाजपने दिल्लीपासून गल्लीपर्यंत यंत्रणा राबवली, ते पाहता पवारांबद्दल साहनुभूती असल्याने पवारांना पूरक धोरण राबवत काँग्रेस वाढवली जाईल, अशी चर्चा आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस