शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ महामार्ग सातारा जिल्ह्यातील सोळा गावांतून जाणार, नवीन आराखड्याबाबत गोपनीयता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:46 IST

Shaktipeeth Mahamarg: शिखर शिंगणापूर, गोंदवले तीर्थक्षेत्र जोडणार : कारखेल, दिवड, कुकुडवाड, मायणीजवळून सांगलीत प्रवेश

सातारा : राज्यात अनेक ठिकाणी विरोध होत असणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाचाच मार्ग बदलण्यात येणार असून, तो सातारा जिल्ह्याच्या माण आणि खटाव तालुक्यांतील जवळपास १६ गावांतून जाणार आहे. याबाबत ऑन रेकाॅर्ड काहीही समोर आलेले नसले तरी तशा हालचाली मात्र सुरू आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील गारवडमधून हा मार्ग साताऱ्यातील कारखेलमध्ये येणार आहे. तेथून पर्यंती, दिवड, कुकुडवाडवरून खटावमधील पडळनंतर मायणीजवळून सांगली जिल्ह्यात जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या मार्गामुळे माणमधील शिखर शिंगणापूर आणि गोंदवले बुद्रुक ही दोन तीर्थक्षेत्रेही जोडली जाणार आहेत.राज्यातील विविध धार्मिक स्थळांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून निघणार असून, कोकणातील पत्रादेवीपर्यंत जाणार आहे. हा मार्ग १२ जिल्ह्यांतून जाणार होता. सुमारे ८०२ किलोमीटर अंतर होते; पण या महामार्गाला सांगली-कोल्हापूरसह काही जिल्ह्यांत विरोध झाला. त्यामुळे याचा मार्ग बदलण्याचा निर्णय झालेला आहे.

वाचा: हुतात्म्यांच्या रक्ताने भिजलेली जमीन शक्तीपीठाला देणार नाही, शेती बचाव समितीचा इशारा शक्तिपीठ महामार्ग पूर्वी सोलापूर जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात जाणार होता. तो आता सोलापूरमधून सातारा जिल्ह्यात येणार आहे. जिल्ह्यातील माण तालुक्यातील १० आणि खटावमधील ६ गावांच्या हद्दीतून तो सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यातील या गावांच्या समावेशाची शक्यतामाण तालुका : कारखेल, पर्यंती, खडकी, वरकुटे - म्हसवड, वाकी, दिवड, धामणी, गटेवाडी, वडजल, कुकुडवाड.खटाव तालुका : कान्हरवाडी, हिवरवाडी, पडळ, कानकात्रे, अनफळे, मायणी.

ग्रामविकासमंत्र्यांचेही सूतोवाचमाण आणि खटाव तालुक्यांतील प्रमुख देवालये शक्तिपीठ महामार्गावर आणण्यात येणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे.

नवीन मार्गाबाबत गोपनीयतामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘शक्तिपीठ होणारच; पण मार्ग बदलून,’ असे वक्तव्य केले होते. त्यामुळे नव्याने आराखडा करण्याचे काम सुरू आहे. मात्र त्यासंबंधी अधिकृतपणे कुणीही बोलत नाही. सध्या तरी चांगलीच गोपनीयता बाळगण्यात येत आहे.

शक्तिपीठापासून शिंगणापूर ४५, तर गोंदवले अंतर १५ किलोमीटरशक्तिपीठ महामार्ग माणमधील गोंदवलेपासून १५ किलोमीटर आणि शिखर शिंगणापूरपासून ४५ किलोमीटरवरून जाणार असल्याचे समजते. याबाबतची अधिसूचना येत्या १५ दिवसांत निघण्याची शक्यता आहे. महामार्ग तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यासाठी आवश्यक भूसंपादन गतीने पूर्ण करा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील बैठकीत दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shaktipeeth Highway to Traverse 16 Satara Villages; New Plan Confidential

Web Summary : The Shaktipeeth Highway route is changing, now passing through 16 villages in Satara's Man and Khatav talukas. The route will connect Shingnapur and Gondavale, with land acquisition expedited. The new plan remains confidential. It will be completed in three years.