शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

कोल्हापूरमधून शाहू छत्रपती, सोलापूरमधून प्रणिती शिंदे तर..., काँग्रेसकडून महाराष्ट्रातील ७ उमेदवारांची यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 21:48 IST

Congress Candidates List Maharashtra: काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आज प्रसिद्ध केलेल्या देशभरातील ५८ उमेदवारांच्या यादीमध्ये महाराष्ट्रामधील ७ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमधील जागावाटप अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेलं नाही. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आज प्रसिद्ध केलेल्या देशभरातील ५८ उमेदवारांच्या यादीमध्ये महाराष्ट्रामधील ७ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती यांना तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये काँग्रेसला मिळणाऱ्या संभाव्य जागांवरील उमेदवारांची घोषणा काँग्रेसकडून आज करण्यात आली आहे. यात नंदूरबार, अमरावती, नांदेड, पुणे, लातूर, सोलापूर, आणि कोल्हापूर या मतदारसंघांचा समावेश आहे. काँग्रेसचे आज उमेदवारी केलेल्या ७ लोकसभा मतदारसंघांचं वैशिष्ट्य म्हणजे यातील चार मतदारसंघ हे आरक्षित आहेत. यामध्ये काँग्रेसने नंदूरबारमधून जी. के. पाडवी, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, पुण्यामधून रवींद्र धंगेकर, लातूरमधून शिवाजीराव काळगे, सोलापूरमधून प्रणिती शिंदे आणि कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

या यादीमुळे काही मतदारसंघातील प्रमुख लढतींचं चित्र स्षष्ट झालं आहे. त्यामध्ये नंदूरबारमध्ये भाजपाच्या हीना गावित विरुद्ध काँग्रेसचे जी. के. पाडवी यांच्यात लढत होईल. तर पुण्यामध्ये भाजपाचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर यांच्यात मुख्य लढत होईल. तर नांदेडमध्ये भाजपाचे प्रतापवार चिखलीकर यांच्याविरुद्ध वसंतरावर चव्हाण यांच्यात मुख्य लढत होईल. 

टॅग्स :congressकाँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीPraniti Shindeप्रणिती शिंदे