पर्यावरण रक्षणासाठी शाडूची गणेशमूर्ती !
By Admin | Updated: July 31, 2016 04:16 IST2016-07-31T04:16:39+5:302016-07-31T04:16:39+5:30
समाजातील अंधश्रद्धा आणि अनिष्ट रुढी परंपरेविरुद्ध काम करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आता पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतला

पर्यावरण रक्षणासाठी शाडूची गणेशमूर्ती !
राजेश भिसे,
जालना- समाजातील अंधश्रद्धा आणि अनिष्ट रुढी परंपरेविरुद्ध काम करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आता पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतला असून, पर्यावरणपूरक म्हणजेच शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण मुलांना दिले जात आहे. यंदाचे जनजागृतीचे हे दहावे वर्ष आहे.
प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीमुळे जलप्रदूषण वाढले आहे. हे ध्यानी घेऊन अंधश्रद्ध निर्मूलन समितीने (अंनिस) २००६ मध्ये पुढाकार घेऊन जलप्रदूषण थांबविण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मूर्तीकार उमेश कापसे, लखन कापसे यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. आतापर्यंत ६ हजार विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले असून, हे प्रशिक्षित विद्यार्थी इतरांमध्ये जनजागृती करीत आहेत, असे डॉ. प्रतिभा श्रीपत, आर्यन श्रीराम यांनी सांगितले.
प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती या पर्यावरणाच्या दृष्टिने घातक आहेत. म्हणूनच इकोफे्रंडली गणेशमूर्ती तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन जात आहे असे अंनिसचे जिल्हाध्यक्ष मधुकर गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. यंदाच्या दहाव्या वर्षात लोकांच़्या प्रतिसादात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
>ना नफा ना तोटा
गणेशमूर्ती तयार करण्यासाठी पुणे, औरंगाबाद किंवा रायगड जिल्ह्यातील पेण येथून शाडू माती विकत आणली जाते. यासाठी सहभागातून पैसे जमा केले जातात. त्यानंतर, गणेशमूर्ती तयार केल्यानंतर त्याची ना नफा ना तोटा तत्त्वावर विक्री केली जाते.