काळवाडी गाव भीतीच्या छायेत, माळीण पुन्हा उद्भवण्याची शंका
By Admin | Updated: August 8, 2016 23:54 IST2016-08-08T23:54:28+5:302016-08-08T23:54:28+5:30
मृत्यूची टांगती तलवार घेऊन मृत्यूच्या दाढेत वसलेले काळवाडी (जांभोरी) हे गाव आहे.
काळवाडी गाव भीतीच्या छायेत, माळीण पुन्हा उद्भवण्याची शंका
ऑनलाइन लोकमत
तळेघर, दि. 9 - गावच्या वरच्या बाजूला रौद्ररूप धारण करून उभा असलेला भयानक डोंंगर, तर गावच्या खालच्या बाजूला डिंभे धरणाचे भव्य पाणलोटक्षेत्र व गाव तसेच पाणलोटक्षेत्राच्या मध्यभागी काही वर्षांपूर्वी पडलेली भली अशी मोठी भेग, अशी मृत्यूची टांगती तलवार घेऊन मृत्यूच्या दाढेत वसलेले काळवाडी (जांभोरी) हे गाव आहे. लवकरात लवकर या गावचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यामध्ये काळवाडी गाव असून, कित्येक वर्षे मृत्यूच्या छायेत वसले आहे. गावच्या वरच्या बाजूला असलेल्या भव्य डोंगरावर सुटलेल्या अवस्थेत मोठमोठाले दगड आहेत. या दगडांना थोडा जरी धक्का लागला तरी गावावर हे दगड कोसळू शकतात. याच काळवाडीच्या खालच्या बाजूला डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे पाणी व काही वर्षांपूर्वी धरण पूर्ण भरल्यानंतर पाण्याच्या दाबामुळे गावच्या खालच्या बाजूला मोठा आवाज होऊन मोठी भेग पडली आहे. अशा परिस्थितीत मृत्यूचा सांगाडा झालेल्या या नैसर्गिक वातावरणामध्ये काळवाडी येथील ग्रामस्थ जीवन जगत आहेत. काळवाडी नं. १ व नं. २ त्याचप्रमाणे शेळकेवस्ती असे मिळून ६० ते ७० घरे असणारे हे गाव आहे. आठ ते दहा दिवसांपासून आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. गावातील घराघरांमध्ये पाण्याचा उपळा येऊन बुडबुडे निघाले आहेत, तर या डोंगरावरील सुटलेले दगड खाली येत आहेत. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे डोंगराचे पाणी झिरपून या गावातील घरांच्या भिंतीना येऊन दोन-तीन दिवसांमध्ये घरे कोसळण्याचेही प्रकार घडले आहेत. शासनदरबारी कित्येक वर्षे या गावाच्या पुनर्वसनाचे प्रस्तावाचे घोंगडे भिजत पडले आहेत. आमच्यावर एखादी घटना घडून गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का? सरकारला आम्हा आदिवासी बापड्यांबद्दल केव्हा जाग येणार? असा प्रश्नही काळवाडी ग्रामस्थांना पडत आहे. गतवर्षी शेळकेवस्तीलगत भली मोठी भेग पडली आहे. स्थानिकांनी वारंवार प्रशासनाला याबाबत कळूनही याकडे मात्र प्रशासन व सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
याबाबत ह्यलोकमतह्णशी बोलताना ग्रामस्थ चिमा कृष्णा पारधी म्हणाले, ह्यह्यबा आम्ही दगडांकडं पाहतोय. दगड आमच्याकडं पाहत्यात. कधी आमच्यावर घाला करील सांगता येत नाही. रात-दिस झोप नाय. घरामध्ये असलेल्या पेटत्या चुलीमधून पाण्याचं उभड (बुडबुडे) निघालंत. माळीणसारखा केव्हा घाला होईल सांगता येत नाही.ह्णह्ण
या गावचे विद्यमान सरपंच संजय केंगले म्हणाले, ह्यह्यया गावाचा पुनर्वसनाचा विषय कित्येक दिवस शासनदरबारी पडून आहे. शासनाने तत्काळ या गावाचे पुनर्वसन करावे. या गावावरील डोंगरालाही भेगा पडल्या असून, घरांवर मोठ्या प्रमाणात ओलावा येत आहे. घटना घडण्यापूर्वी सरकारने याबाबतची काळजी घ्यावी.ह्णह्ण
या गावामध्ये पावसाच्या दिवसांमध्ये घरामध्ये पाणी निघणे, घरांना तडे जाणे, डोंगरावरील दगड खाली येणे असे प्रकार घडत असतात. तत्काळ या गावाचे स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ नामदेव भोकटे, ग्रा. पं. सदस्य सुरेश भवारी, बबन पारधी, सीताराम भोकटे, ढवळा पारधी, सखाराम केंगले, सोमा भोकटे, चंद्रकांत पारधी, पांडुरंग पारधी, रमेश पारधी या ग्रामस्थांनी केली आहे.