शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दोघांच्या सहमतीनेच शरीरसंबंध घडले; बलात्कारप्रकरणातून शास्त्रज्ञाची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 11:01 IST

खोटे आश्वासन दिल्याचे स्पष्ट पुरावे असतील तर या परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टीने पाहता येईल, असे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. किशोर मोरे यांनी म्हटले. महिलेने उलटतपासणीत सांगितले की, आरोपीने एप्रिल २०२० मध्ये लग्नाचे आश्वासन दिले होते.

मुंबई : जेव्हा एखादी स्त्री परिणाम माहीत असूनही शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेते, तेव्हा तिची संमती ‘चुकीच्या समजुतीवर’ आधारित मानली जाऊ शकत नाही, असे नमूद करीत सत्र न्यायालयाने लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका अनिवासी भारतीय (एनआरआय) शास्त्रज्ञाची निर्दोष मुक्तता केली. 

खोटे आश्वासन दिल्याचे स्पष्ट पुरावे असतील तर या परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टीने पाहता येईल, असे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. किशोर मोरे यांनी म्हटले. महिलेने उलटतपासणीत सांगितले की, आरोपीने एप्रिल २०२० मध्ये लग्नाचे आश्वासन दिले होते. त्यावरून असे लक्षात येते की, आरोपी त्याच्या आई-वडिलांना समजावण्याचा प्रयत्न करीत होता. कारण महिला विवाहित होती आणि तिने इस्लाम धर्म स्वीकारला होता. सर्व परिस्थिती विचारात घेता त्या दोघांच्या सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते, असेही न्यायालयाने नमूद केले. 

“हॉटेलमध्ये आल्यापासून तिथून निघेपर्यंत महिलेने आरोपीच्या सहवासाचा आनंद घेतला. महिलेने हॉटेलचे कर्मचारी किंवा व्यवस्थापकाकडे आरोपीबाबत तक्रार केली नाही. तक्रार करण्यासाठी सहा दिवसांचा विलंब का झाला? याचे समाधानकारक कारण ती  पीडिता देऊ शकली नाही”, असेही न्यायालयाने म्हटले.   मूळ गुजरातचा असलेला पण युरोपमध्ये काम करणाऱ्या एनआरआय शास्त्रज्ञावर ठाण्यातील एका २७ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका शास्त्रज्ञावर असा आरोप झाल्याने सर्वांचेच लक्ष खटल्याच्या निकालाकडे लागले होते.

टॅग्स :Courtन्यायालयMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषण