शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीच्या वेदशाळेत मुलांवर लैंगिक अत्याचार; ब्राह्मण समाजात तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 12:58 IST

परभणी येथील श्री गणेश वेद पाठशाळेत वेदशास्रसंपन्न होण्यास शिकणाऱ्या तीन कोवळ्या मुलांवर संस्थाचालकांच्या नात्यातील अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने ब्राह्मण समाजात संतापाची लाट उसळली आहे.

परभणी येथील श्री गणेश वेद पाठशाळेत वेदशास्रसंपन्न होण्यास शिकणाऱ्या तीन कोवळ्या मुलांवर संस्थाचालकांच्या नात्यातील अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने ब्राह्मण समाजात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पाठशाळेचे संचालक सुधीर कुलकर्णी आणि अन्य दोघांविरुद्ध परभणीच्या नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कुलकर्णी यास अटक करण्यात आली आहे.ज्या तिघांवर लैंगिक अत्याचार झाले त्यांच्या पालकांनी तीनपैकी दोन मुलांना सोबत घेऊन शुक्रवारी परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांची भेट घेऊन अनन्वित अत्याचाराची कहाणी सांगितली. उपाध्याय यांनी लगेच तक्रार दाखल करवून घेण्याचे आदेश दिले. दोन मुलांनी आपबिती सांगितली तेव्हा बयाण तसेच आॅडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारीदेखील चक्रावून गेले. ज्याचा प्रचंड लैंगिक छळ झाला असा तिसरा मुलगा त्याच्या गावी इस्पितळात उपचार घेत असून त्याच्या जखमांवर डॉक्टरांना कितीतरी टाके घालावे लागले आहेत.अत्याचारग्रस्त मुलांना न्याय मिळावा म्हणून ब्राह्मण समाजातील अनेक वेदशास्रसंपन्न व्यक्ती तसेच पुरोहितांनी परभणीच्या पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. दुसरीकडे समाजातील प्रकरण आपसात मिटवा असा दबाव पालकांवर आणण्याचेही समाजातीलच काही व्यक्तींकडून प्रयत्न झाले. त्यासाठी परभणीतील एका दोन बड्या लोकप्रतिनिधीला मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न झाला, पण पालकांनी ते धुडकावून लावत त्या लोकप्रतिनिधींना अक्षरश: पिटाळून लावले.

घृणास्पदरीत्या छळगेल्या महिन्यापासून या मुलांवर लैंगिक अत्याचार सुरू होते. अत्याचार करणारे दोघेही त्याच शाळेत विद्यार्थी आहेत. मुलांना नग्न करून उलटे टांगणे, पायपाने जबर मारहाण करणे, गुप्तांगास दोरी बांधून ओढणे असे घृणास्पद प्रकार केले गेले. या प्रकाराकडे संस्थाचालक कुलकर्णी यांनी डोळेझाक केल्याचे पालकांनी तक्रारीत म्हटले.

टॅग्स :parabhaniपरभणीSexual abuseलैंगिक शोषणMaharashtraमहाराष्ट्र